agriculture news in Marathi,traders should accept new changes in agri produce market,Maharashtra | Agrowon

व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल स्वीकारणे आवश्यक

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

ई-नामचा निर्णय चांगला आहे. बदलत्या काळानुसार बाजार समित्यांनी हा बदल स्वीकारला पाहिजे. ई-नाम प्रणालीचे इन्फास्ट्रक्चर सक्षम असेल पाहिजे. हा बदल स्वीकारण्यासाठी वेळ लागणार आहे. पारंपरिक पद्धत आणि नवीन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. तरच बाजार समित्या टिकतील.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. व्यापाऱ्यांनीही काळानुसार शेतकमाल बाजारातील बदल स्वीकारावे. त्यासाठी सरकारने ‘ई-नाम’साठीच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. मात्र ‘ई-नाम’मध्ये व्यवहार करताना व्यापाऱ्यांचे अस्तित्व काय असणार आहे? बांधावर होणारी शेतकऱ्यांची फसवणूक कशी थांबेल? याचा काय विचार झाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. 

व्यापारी म्हणतात...

  • बाजार समित्या बरखास्त केल्यास व्यवहारांवर नियंत्रण कुणाचे असेल?
  • शेतकऱ्यांना वाजवी दर कसे मिळतील?
  • बाजार समित्यांनीच नवीन बदल स्वीकारायला पाहिजेत.
  • छोटे व्यापारी ‘ई-नाम’वर व्यवहार करू शकणार नाहीत.
  • शेतकरी शेतमाल बाजाराच्या मुख्य प्रवाहपासून दुरावेल.
  • ई-नाम’चे व्यवहार शेतकऱ्यांच्या फायद्याचे. 
  • बाजार समित्यांच्या व्यवहारात सुधारणा करावी.
  • बाजार समित्या पूर्णपणे बंद करणे चुकीचे.

प्रतिक्रिया
बांधावर व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे बुडत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. बाजार समितीचे नियंत्रण असल्याने आम्हाला सहा टक्के कमिशन घेता येते. तसचे २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे बंधन असते. तसे केले नाही तर बाजार समिती कारवाई करू शकते. मात्र थेट माल खरेदी केल्यावर ही बंधने राहणार नाहीत, दरावरही बंधन राहणार नसल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली राहणार नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही लाखो रुपये उचल दिली आहे, त्याबदल्यात आम्हाला माल मिळण्याची हमी आहे. मात्र बाजार समिती नसेल तर वाटेल त्या दराने खरेदी विक्री होईल, त्यावर सरकार कसे नियंत्रण आणेल हे स्पष्ट करावे. 
- करण जाधव, आंब्याचे व्यापारी, गुलटेकडी मार्केटयार्ड, पुणे

सध्या प्रचलित असलेली ही व्यवस्था मोडीत काढण्याचा हा डाव दिसतो. सहकार क्षेत्रावर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचा तर उद्देश नाही ना, अशी शंका येते. परंतु ही व्यवस्था मोडताना आपण जी पर्यायी यंत्रणा देणार आहोत, त्यात शेतकऱ्यांची फसवणूक अधिक दिसते. मोठा शेतकरी कदाचित हे ऑनलाइन व्यवहार करूही शकेल, मात्र छोटा शेतकरी कसा तग धरेल. या निर्णयामुळे पुन्हा एकदा खेडा खरेदीला प्रोत्साहन मिळेल. शेतकऱ्यांचा आज मुख्य प्रवाहासोबत असलेला संपर्क तुटणार आहे. यात सामान्य शेतकऱ्यांचे हित दिसत नाही.
- चंद्रशेखर खेडकर, अडते-व्यापारी, अकोला 

शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे संबंध चांगलेच असतात. ई-नाम बाजार समित्यांमार्फतच राबविले जात आहे. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त केल्या तर मग ई-नाम राबवायचे कुणामार्फत हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे निर्णय योग्य वाटत असला तरी चांगली पर्यायी व्यवस्था निर्माण न करता बाजार समित्या बरखास्त करणे चुकीचे ठरेल.
- दिलीप गांधी, सचिव, व्यापारी असोसिएशन, औरंगाबाद 

शासनाच्या नियमानुसार सर्व व्यापारी ऑनलाइन व्यवहार करायला तयारच आहेत. परंतु अनेक शेतकरी रोख रक्कम मागतात. ऑनलाइन व्यवहाराला तयार होत नाहीत. बाजार समिती बरखास्त करून काय होणार? बाजार समिती बरखास्त झाल्या तर बाजार चालणार कसा? बाजार चालू शकत नाही. या सर्व बाबी शेतकऱ्यांशी निगडित आहेत.
- सुनील कटारिया, व्यापारी, बाजार समिती, नगर 

‘ई-नाम’चे व्यवहार शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. पण यामध्ये व्यापाऱ्यांचे काय होणार, आज बाजार समित्याही बरखास्त करण्याबाबत बोलले गेले. पण या व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या घटकांचा विचार कसा करणार, बाजार समितीच्या व्यवहारात वा व्यापारात त्रुटी असू शकतात, त्या दुरुस्त कराव्यात, पण त्या ऐवजी ही व्यवस्थाच संपवावी, हा उद्देश चुकीचा आहे. 
- सादिक नदाफ, व्यापारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर

 


इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...