फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर उपचार ः महादेव जानकर

फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर उपचार ः महादेव जानकर
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर उपचार ः महादेव जानकर

बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्रासाठी १६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या फिरते पशू चिकित्सालय, गो संवर्धन योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. फिरत्या पशू चिकित्सालयामार्फत आता पशूंवर पाहिजे त्या ठिकाणी उपचार करणे शक्य होणार आहे. पशूंना दवाखान्यात आणण्याची गरज नाही, असे मत पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

मलकापूर येथे आयोजित प्रदर्शन समारोप प्रसंगी ते बोलत होते. श्री. जानकर पुढे म्हणाले, की दुष्काळी परिस्थितीतही पशुपालकांनी आपल्या पशूंना चारा, पाण्याची व्यवस्था केली. त्यांचे आरोग्य सांभाळले, त्या जोरावरच दूध उत्पादनात महाराष्ट्र आज देशात अव्वल आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या धर्तीवर जिल्ह्यात पशू विज्ञान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पशूसंदर्भात संशोधन, विकासाला गती मिळून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शासन जनावरांचा विमा उतरविणार असून विम्याचा हप्ता शासन भरणार आहे. राज्य तेलंगणा, आंध्र प्रदेशातून अंडी खरेदी करायचे, मात्र गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राने आपली गरज भागवून तीन कोटी अंडी विक्री केली आहे. तसेच मत्स्यबीजमध्ये पं. बंगालवर आपण अवलंबून असायचो, गेल्या दोन वर्षांत राज्याने आपली गरज भागवून मत्स्यबीजही विकले आहे. पदुम विभागाला उत्पन्नशील बनविले. पदुम विभागाचे उत्पन्न दररोज साडेचार कोटी रुपयांचे झाले आहे. ही वाढ पशुपालक, शेतकरी यांच्या परिश्रमामुळे व योजनांच्या अंमलबजावणीमुळे झाली आहे. पदुम विभागाच्या सर्व योजना ऑनलाइन करण्यात आले असल्याचेही या वेळी जानकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जैस्वाल यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com