वृक्ष लागवड मोहीम मिशन मोडवर राबवा ः मुनगंटीवार

वृक्ष लागवड मोहीम मिशन मोडवर राबवा ः मुनगंटीवार
वृक्ष लागवड मोहीम मिशन मोडवर राबवा ः मुनगंटीवार

नागपूर  ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच वृक्ष आच्छादनाचे ३३ टक्‍के राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला मिशन मोडवर राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  वनामती येथे नागपूर विभागातील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा वनमंत्री यांनी घेतला. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार अनिल सोले, आमदार सुधीर पारवे, विभागीय आयुक्‍त डॉ. संजीवकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, नितीन काकोडकर, बी. एस. हुड्डा, शैलेश टेंभुर्णीकर, श्रीनिवास राव, कल्याण कुमार, सर्व जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की नागपूर विभागासाठी ५ कोटी ९४ लाख ५६ हजार एवढे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. हे पूर्ण करण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असून, या मोहिमेला १ जुलैपासून आनंदवन येथून सुरवात होत आहे. विभागात वृक्ष लागवडीसाठी ३ कोटी खड्डे तयार करण्यात आले आहेत. वृक्षारोपणाची सर्व प्रकारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. वृक्ष लागवडीबद्दल जनतेमध्ये विश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी कमांड रूमसुद्धा तयार करण्यात आली आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करताना कन्यावन समृधी योजनेच्या माध्यमातून दहा झाडे देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यातील पाच झाडे सागाची असून, उर्वरित पाच झाडे ही फळवृक्ष आहेत. वृक्ष लागवड हे जनआंदोलन व्हायला हवे. वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले, तरच ३३ टक्‍के हरित महाराष्ट्र मोहीम यशस्वी होऊ शकेल. बैठकीच्या सुरवातीला विभागीय आयुक्‍त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर विभागातील ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. या वेळी जिल्हानिहाय मोहिमेचा आढावा घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com