Agriculture news in marathi;Tree plantation campaign will be implemented in mission mode: Mungantiwar | Agrowon

वृक्ष लागवड मोहीम मिशन मोडवर राबवा ः मुनगंटीवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

नागपूर  ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच वृक्ष आच्छादनाचे ३३ टक्‍के राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला मिशन मोडवर राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

नागपूर  ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच वृक्ष आच्छादनाचे ३३ टक्‍के राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला मिशन मोडवर राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

वनामती येथे नागपूर विभागातील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा वनमंत्री यांनी घेतला. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार अनिल सोले, आमदार सुधीर पारवे, विभागीय आयुक्‍त डॉ. संजीवकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, नितीन काकोडकर, बी. एस. हुड्डा, शैलेश टेंभुर्णीकर, श्रीनिवास राव, कल्याण कुमार, सर्व जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की नागपूर विभागासाठी ५ कोटी ९४ लाख ५६ हजार एवढे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. हे पूर्ण करण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले असून, या मोहिमेला १ जुलैपासून आनंदवन येथून सुरवात होत आहे. विभागात वृक्ष लागवडीसाठी ३ कोटी खड्डे तयार करण्यात आले आहेत.

वृक्षारोपणाची सर्व प्रकारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. वृक्ष लागवडीबद्दल जनतेमध्ये विश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी कमांड रूमसुद्धा तयार करण्यात आली आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करताना कन्यावन समृधी योजनेच्या माध्यमातून दहा झाडे देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यातील पाच झाडे सागाची असून, उर्वरित पाच झाडे ही फळवृक्ष आहेत. वृक्ष लागवड हे जनआंदोलन व्हायला हवे.

वृक्ष लागवड मोहिमेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले, तरच ३३ टक्‍के हरित महाराष्ट्र मोहीम यशस्वी होऊ शकेल. बैठकीच्या सुरवातीला विभागीय आयुक्‍त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर विभागातील ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. या वेळी जिल्हानिहाय मोहिमेचा आढावा घेण्यात आला.

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...