agriculture news in Marathi,Tur producers in trouble due to loss by rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार नाहीत

माणिक रासवे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली आमदनी होईल, कर्ज फेडता येईल, असं वाटलं होतं. पण, पावसानं तुरीमध्ये पाणी साचून राहिलं. नुकसान कमी करण्यासाठी दहाची मोटार लावून शेताबाहेर पाणी काढलं. पण, काहीच उपयोग झाला नाही. जमिनीतलं पाणी हटलं नाही. जेवढ्याला तेवढं येत राहील. फुलगळ झाली, पानगळ झाली. तुरीच्या नुसत्या तुराट्या शिल्लक राहिल्या. कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्यादेखील होणार नाहीत. जळतनं म्हणूनदेखील वापरता येणार नाही, सालभर कसं धकवायचं याची चिंता आहे. कर्ज फेडणंही शक्य नाही, अशा शब्दांत मोरेगाव येथील तरुण शेतकरी श्‍याम मगर यांनी व्यथा मांडली. 

परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली आमदनी होईल, कर्ज फेडता येईल, असं वाटलं होतं. पण, पावसानं तुरीमध्ये पाणी साचून राहिलं. नुकसान कमी करण्यासाठी दहाची मोटार लावून शेताबाहेर पाणी काढलं. पण, काहीच उपयोग झाला नाही. जमिनीतलं पाणी हटलं नाही. जेवढ्याला तेवढं येत राहील. फुलगळ झाली, पानगळ झाली. तुरीच्या नुसत्या तुराट्या शिल्लक राहिल्या. कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्यादेखील होणार नाहीत. जळतनं म्हणूनदेखील वापरता येणार नाही, सालभर कसं धकवायचं याची चिंता आहे. कर्ज फेडणंही शक्य नाही, अशा शब्दांत मोरेगाव येथील तरुण शेतकरी श्‍याम मगर यांनी व्यथा मांडली. 

परभणी जिल्ह्यातील श्‍याम श्रीधरराव मगर यांच्या कुटुंबाची मोरगाव (ता. सेलू) शिवारात दोन ठिकाणी मिळून एकूण ३५ एकर जमीन आहे. त्यापैकी २२ एकर जमीन दुधना नदीकाठच्या भागात आहे. दोन वर्षांपूर्वी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे मगर यांची संपूर्ण पिके पाण्याखाली गेली होती. यंदा नदीला पूर आला नाही. परंतु, पाणी साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले.

मगर यांनी यंदा १० एकरवर तूर आणि सोयाबीन आंतरपिकाची पेरणी केली. त्याशेजारी १२ एकरवर तूर अधिक कापूस लागवड केली. या भागात सुरुवातीला पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस पडत होता. परंतु, संपूर्ण पावसाळ्यात पडला नाही तेवढा पाऊस यंदा सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये पडला. शेतात पाणी साचले. मोठे बांध असल्यामुळे ते फोडून पाणी बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे मगर यांनी १० एचपीचा विद्युत पंप लावून सलग १३ दिवस तुरीच्या शेतातील पाण्याचा उपसा केला. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. दहा एकरावरील तूर आणि सोयाबीनमध्ये पाणी साचून राहिल्याने हाती आलेले पीक वाया गेले.

बियाणे, खते, फवारणी, मशागत, मजुरी मिळून दहा एकरामध्ये दीड लाख रुपयांवर खर्च झाला. तुरीचे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असते. सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले.

सोयाबीन काढणीसाठी मजुरांना दहा हजार रुपये उचल दिली. परंतु, पाऊस सुरू झाल्यामुळे सोयाबीन काढता येईना आणि मजुरांना दिलेली दहा हजार रुपयांची उचल परत मागता येईना. सोयाबीनला मोड फुटले. एकरी ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा भिजल्याने वजनही कमी भरणार, डागील मालाची व्यापारी भाव पाडून खरेदी करीत आहेत. कापसाचे पहिल्या बहराचे २५ ते ३० बोंडे फुटली. वेचणी करता आली नाही. सरकीला मोड फुटले. एकरी ४ ते ५ क्विंटलचे नुकसान झाले.

हजारो हेक्टरवरील उभे पीक नष्ट
कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार राज्यात तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर आहे. यंदा १२ लाख ७ हजार ४७७ हेक्टरवर (९७ टक्के) तुरीची पेरणी झाली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी सोयाबीन अधिक तूर तसेच तूर अधिक कापूस या आंतरपीकपद्धतीचा अवलंब करतात. लवकर येणाऱ्या वाणांचे तुरीचे पीक सध्या गाठी धरण्याच्या तसेच फुलोरा अवस्थेत आहे. उंच, माथ्यावरच्या जमिनीवरील फुले लागण्याच्या अवस्थेतील तुरीचे पावसामुळे फारसे नुकसान झाले नाही. परंतु ओढे, नाले, नद्यांकाठच्या तसेच सखल भागातील शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने तूर पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने मुळकुज होत आहे. हजारो हेक्टरवरील तुरीचे उभे पीक नष्ट होत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....
मोसंबी कलमांची दुप्पट विक्री औरंगाबाद : पाण्याच्या उपलब्धतेबाबत सुखद...