Agriculture news in marathiUjani dam is still at minus level | Agrowon

उजनी धरण अद्यापही उणे पातळीतच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

पुरेशा पावसाअभावी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण अद्यापही उणे पातळीत आहे. बुधवारी (ता.२१) दुपारपर्यंत धरणात उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी होती.

सोलापूर : पुरेशा पावसाअभावी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण अद्यापही उणे पातळीत आहे. बुधवारी (ता.२१) दुपारपर्यंत धरणात उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी होती. जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाणी योजनांचे भवितव्य धरणातील पाण्यावरच अवलंबून असते. परंतु धरणातील पाण्याच्या स्थितीमुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे. 

धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातच पाऊस कमी झाल्याने उजनी धरण मृतसाठ्यात आहे. तरीही वरच्या धरणांकडून येणारा विसर्ग कायम आहे. सध्या दौंडकडून येणारा विसर्ग ८७९१ क्युसेकवर आहे. या पाण्यामुळेच उणे पातळीत गेलेले धरण हळूहळू भरत आहे. बुधवारी हा पाणीसाठा उणे ३.३४ टक्के होता. गेल्या तीन-चार वर्षांत सलगपणे जुलैच्या महिन्यात धरण जिवंत साठ्यात राहिले आहे. पण यंदा पुरेशा पावसाअभावी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा आजअखेर जिल्ह्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला आहे. पण पाणीपातळीत वाढ होईल, असा दमदार पाऊस झाला नसल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. 

असा आहे पाणीसाठा 
बुधवारी धरणातील एकूण पाणीपातळी ४९०.७७० मीटरपर्यंत होती. तर एकूण पाणीसाठा ६१.४० टीएमसी इतका होता. त्यापैकी उपयुक्त साठा उणे १.७९ टीएमसी इतका होता. तर पाण्याची टक्केवारी उणे ३.३४ टक्क्यांपर्यंत होती.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...