नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार
पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अंशत: ढगाळ हवामानामुळे तापामनात चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी (ता. १४) कमी झालेले किमान तापमान शुक्रवारी (ता. १५) पुन्हा वाढल्याचे दिसून आले. नागपूर येथे राज्यातील नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १६) राज्यात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. १७) तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दुपारी वाढणार उन्हाचा चटका आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती यामुळे राज्याच्या काही भागांत ढगाळ हवामान होत आहे. हवामानात होत असलेल्या वेगवान बदलामुळे तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. नगर येथे १२.१ अंशापर्यंत खाली आलेले तापमान शुक्रवारी पुन्हा १५ अंशांवर गेले. तर इतरही ठिकाणी तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. मध्य प्रदेशातील पंचमढी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १५) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान झाले होते. उष्ण व दमट हवामानामुळे पिकांवर कीड रोंगाचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे उभी पिके काढता आली नाहीत. आता पावसाने उघडीप दिल्याने उरली सुरली पिके काढण्याची कामे सुरू आहे. यातच काही भागांत पावसाळी वातावरण झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडली आहे.
शुक्रवारी (ता. १५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८.१ (३), नगर १५.० (०), जळगाव १७.०(२), कोल्हापूर २०.६(३), महाबळेश्वर १५.५(१), मालेगाव १७.६ (३), नाशिक १६.२ (३), सांगली १९.५ (२), सातारा १८.५ (२), सोलापूर २०.५ (२), अलिबाग २२.८ (२), डहाणू २२.८ (१), सांताक्रूझ २३.२ (२), रत्नागिरी २३.२ (१), औरंगाबाद १४.८ (०), परभणी १६.४ (-१), नांदेड १५.५ (-१), उस्मानाबाद १४.८ (-१), अकोला १५.० (-२), अमरावती १६.२ (-२), बुलडाणा १६.४ (-१), चंद्रपूर १८.२ (१), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १४.५ (-२), वर्धा १५.४ (-१), यवतमाळ १५.० (-२).