नगर जिल्ह्यात ७६१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनातर्फे पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत ७६१ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. श्रीरामपूर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांतील ५१७ गावे व २७९७ वाड्या-वस्त्यांवरील ११ लाख ८९ हजार ६४९ लोकसंख्येसाठी तब्बल ७६१ टॅंकर रोज धावत आहेत. 

गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमधून टॅंकरमागणी प्रस्तावांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. सध्या अकोले, राहाता, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे तालुक्‍यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर पाथर्डीत सुरू आहेत. येथे १५१ टॅंकरद्वारे १०७ गावे व ६०८ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ४२ हजार ५१९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राहुरी तालुक्‍यात केवळ एका टॅंकरद्वारे दोन गावांमधील ५६२ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. २००३ नंतर या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यामुळे भूजलस्तर कमालीचा घटला. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. उन्हाच्या झळा जसजशा वाढतील, तसतशी टॅंकरची मागणी झपाट्याने वाढत जाईल, असे दिसते. 

तालुकानिहाय टॅंकरसंख्या : संगमनेर ५६, अकोले ०७, कोपरगाव १०, राहुरी ०१, नेवासे २५, राहाता ०४, नगर ६३, पारनेर १४१, पाथर्डी १५१, शेवगाव ६२, कर्जत ८७, जामखेड ९३, श्रीगोंदे ६१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com