Agriculture news in marathi;Water resources in Girran, Waghur continue to grow | Agrowon

गिरणा, वाघूरमधील जलसाठ्यात वाढ सुरूच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशातील अनेक मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठाही वाढत आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात ७३.०१ टक्के तर वाघूरमध्ये ३९.१६ टक्‍के जलसाठा झाला. 

जळगाव ः खानदेशातील अनेक मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठाही वाढत आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात ७३.०१ टक्के तर वाघूरमध्ये ३९.१६ टक्‍के जलसाठा झाला. 

पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी वाघूरचे लाभक्षेत्र असलेल्या चाळीसगाव, पाचोरा व औरंगाबादमधील सोयगावनजीकच्या डोंगररांगा, सातमाळ्याच्या भागात हलका, मध्यम पाऊस सुरूच आहे. यामुळे या प्रकल्पाचा साठा मागील दोन दिवसांत पाच टक्‍क्‍यांनी वाढला. तर गिरणा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या गुजरातमधील सापुतारा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व लगतच्या भागातही बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी झाल्याने या धरणाचा साठा पाच वर्षांनंतर ७३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. मागील वर्षी गिरणा प्रकल्प जेमतेम सुमारे ४० टक्केच भरला होता. 

खानदेशातील या प्रकल्पांमधून विसर्ग
खानदेशात मुक्ताईनगर (जि. जळगाव) नजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे १४ दरवाजे सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण उघडे होते. जळगाव जिल्ह्यात चोपडा (जि. जळगाव) तालुक्‍यातील गूळ, रावेरातील गारबर्डी लघुप्रकल्प, मंगरूळ व सुकी मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू होता. धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यातील अनेर प्रकल्पाचे १० दरवाजे सोमवारी सकाळी पूर्ण उघडे होते. तसेच धुळे तालुक्‍यातील पांझरा, जामखेडी या प्रकल्पांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू होता. नंदुरबारमधील रंगावली प्रकल्पासह तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडे होते. 

हे प्रकल्प कोरडे व भरण्याची प्रतीक्षा
जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील हिवरा, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती हे प्रकल्प कोरडेच आहेत. तर बोरी प्रकल्पात १६.६२ आणि बहुळामध्ये १४.९२ टक्के जलसाठा झाला आहे. यावलमधील मोर प्रकल्पात सुमारे ७३ टक्के जलसाठा होता. त्याच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्पात ३७.६९ टक्के, दर नंदुरबारमधील शिवन प्रकल्पात ८६.१० टक्के जलसाठा होता. 

१०० टक्के भरलेले प्रकल्प 
जळगाव जिल्हा - मंगरूळ, सुकी, अभोरा, तोंडापूर. धुळे - पांझरा, मालनगाव, बुराई, करवंद, जामखेडी. नंदुरबार - दरा, रंगावली. 


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...