पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई कायम

पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई कायम
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई कायम

पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात असलेले तालुके आणि घाटमाथ्यांवर पावसाने दमदार हजेरी लावली. पाणलोटातील पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र या जिल्ह्यांचा पूर्व भाग, सांगली, सोलापूरसह जिल्ह्यांत मात्र पावसाने ओढ दिल्याने टंचाई कायम आहे. विभागातील ८२० गावे, ५ हजार ३२७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ३१ टॅंकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.  

मॉन्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसाने टंचाई हळहळू कमी होऊ लागली आहे. गेल्या आठवडाभरात विभागातील १३ तालुक्यांमधील टॅंकर पूर्णपणे बंद झाले आहेत. तर २८ तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही झळा कायम आहेत. जून महिन्याच्या अखेरीस विभागातील ४१ तालुक्यांतील ९८९ गावे ५ हजार ८७५ वाड्यांना १ हजार २०४ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. जूनच्या शेवटच्या आणि जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही पाझर फुटू लागले आहेत. त्यामुळे टंचाई कमी होऊ लागली आहे. मात्र विभागातील टंचाई पूर्णपणे निवारण्यासाठी सातत्यपूर्ण जोरदार पावसाची आवश्यकता आहे. 

बुधवारपर्यंत (ता. १७) विभागातील टंचाईग्रस्त भागातील १८ लाख ८१ हजार लोकसंख्या आणि ७ लाख ५३ हजार पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. यासाठी ४५८ विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पावसाने ओढ दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. जिल्ह्यात टंचाई वाढल्याचे दिसून येत आहे. तेथील ३३७ गावे १ हजार ९६७ वाड्यांमध्ये ३८३ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर सांगली जिल्ह्यातील १७७ गावे १२२५ वाड्यांना २१६ टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. साताऱ्यातील १७६ गावे ९३९ वाड्यांना २०८ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील १३० गावे १ हजार १९६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी २२१ टॅंकर सुरू होते.

टंचाईग्रस्त भागात टॅंकरची तालुकानिहाय संख्या 

  • पुणे ः इंदापूर ६९, बारामती ४८, पुरंदर ३२, दौंड ३२, शिरूर २७, आंबेगाव ५, जुन्नर ४, हवेली ४.
  • सातारा ः माण १२०, खटाव ४०, फलटण ३९, कारेगाव १०.
  • सांगली ः जत ११८, आटपाडी ३८, कवठेमहांकाळ २४, तासगाव १९, खानापूर १६, मिरज ३.
  • सोलापूर ः मंगळवेढा ६०, सांगोला ५९, करमाळा ५१, माढा ४२, मोहोळ ३१, दक्षिण सोलापूर ३१, माळशिरस २८, उत्तर सोलापूर २४,  बार्शी २३, पंढरपूर १९, अक्कलकोट १५.
  • विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
    जिल्हा गावे वाड्या एकूण टँकर्स
    पुणे १३० ११९६ २२१
    सातारा १७६ ९३९ २०९
    सांगली १७७ १२२५ २१८
    सोलापूर ३३७ १९६७ ३८३
    एकूण ८२० ५३२७ १०३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com