सातपुडा, सातमाळच्या पायथ्याशी पाणीटंचाई

यावल तालुक्‍यातील न्हावी, हंबर्डी भागांतील दोन ते अडीच लाख केळी झाडांना पाणीटंचाईचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सातपुड्यालगत यंदा प्रथमच जलसंकट गंभीर बनले आहे. - संदीप पाटील, शेतकरी,यावल (जि. जळगाव)
सातपुडा, सातमाळच्या पायथ्याशी पाणीटंचाई
सातपुडा, सातमाळच्या पायथ्याशी पाणीटंचाई

जळगाव : खानदेशात सातपुडा पर्वतासह सातमाळा पर्वताच्या पायथ्याशी पाण्याची समस्या वाढत आहे. केळी बागांसह कलिंगड, भाजीपाला पिकांच्या सिंचनाबाबत अडचणी येत आहेत. केळी पिकाला फटका बसत असल्याची स्थिती आहे.  

गिरणा व तापीकाठ, वाघूरचे क्षेत्र वगळता सर्वत्र जलसंकट आहे. सातपुडा पर्वतालगत खानदेशातील रावेर, यावल, चोपडा (जि. जळगाव), शिरपूर (जि. धुळे), शहादा, अक्कलकुवा व तळोदा (जि. नंदुरबार) हे तालुके आहेत. यातील तळोदा व अक्कलकुवा वगळता सातपुडा पर्वतानजीक अनेक वर्षांनंतर जलसंकट गंभीर आहे.

यावलमधील मोर प्रकल्पातील जलसाठा ३० टक्‍क्‍यांखाली आहे. यावलमधील वड्री, कोरपावली, विरावली, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, भालोद, न्हावी, हंबर्डी, पिंपरूड, अमोदा, मारूळ भागांतील शिवारात केळी पिकाचे सिंचन करताना अडचणी येत अाहेत. कूपनलिकांची जलपातळी घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेरातील गारबर्डी प्रकल्पही कोरडा होण्याची स्थिती आहे.

अभोळा, सुकी, मंगरूळ हे प्रकल्प मे महिन्यात ३० टक्केच भरलेले राहतील. रावेरातील केऱ्हाळे, निरूळ, पाडळे, कर्जोत भागातील शिवारात संकट वाढत आहे. चोपड्यातील पंचक, लोणी, खर्डी, वर्डी, आडगाव, धानोरा, अडावद, लासूर, मामलदे, चुंचाळे, चहार्डी भागातही जलसंकट वाढले आहे. कांदा, केळीच्या शेतीला या भागात फटका बसला आहे.

शिरपुरातील तऱ्हाडी, निमझरी, अर्थे, कुवे, शहादामधील तोरखेडा, बामखेडा, जयनगर भागात जलसंकट आहे. तळोदा व अक्कलकुवामधील अनेक गावांमध्ये स्थिती बरी आहे.

सातमाळालगतच्या पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तालुक्‍यांतही जलसंकट वाढले आहे. या भागातील कांदा, भाजीपाल्याची शेती संकटात सापडली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com