agriculture news in marathi,water storage capacity increase, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी साठवण क्षमता वाढली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018
नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाशी संबंधित गेल्या तीन वर्षांत १६ हजारांहून अधिक कामे झाली असून, तब्बल ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामांमुळे ओझरखेड धरण भरेल, एवढी पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
 
नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, मालेगावसह अनेक तालुके वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सोसत आहेत. यामुळे गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात केली.
 
नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाशी संबंधित गेल्या तीन वर्षांत १६ हजारांहून अधिक कामे झाली असून, तब्बल ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामांमुळे ओझरखेड धरण भरेल, एवढी पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
 
नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, मालेगावसह अनेक तालुके वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सोसत आहेत. यामुळे गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात केली.
 
पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणीवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे करणे, निकामी झालेले बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता पुन्हा स्थापित करून पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या योजनेचा उद्देश 
होता.
 
या योजनेअंतर्गत २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत जिल्ह्यातील ६४० गावांमध्ये एकूण १६ हजार ८५९ कामे करण्यात आली आहेत. त्याद्वारे जिल्ह्यात ६४ हजार ७२७ टीसीएम (थाउजंड क्‍युबिक मीटर) पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. म्हणजेच ही क्षमता २ हजार २८२ दशलक्ष घनफूट एवढी असून, ही क्षमता ओझरखेड धरणापेक्षा जास्त आहे. लिटरमध्ये याबाबतचा अंदाज घ्यावयाचा झाल्यास ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता वाढली आहे.
 
या पाण्यामुळे लाखो हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. ‘जलयुक्त’च्या कामांमुळे अनेक गावांच्या विहिरींमधील पाण्याची पातळी एक ते दीड मीटरने वाढल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ५४ प्रकारची कामे हाती घेण्यात आली. साखळी सिमेंट बंधारे, काँक्रीट नाला बंधारे, नाला खोलीकरण व रुंदीकरण आदी प्रकारची बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१७-१८ मध्ये १८० गावांत ३० टक्‍क्‍यांहून कमी कामे झाली आहेत. १२ गावांत ५० टक्‍क्‍यांहून अधिक तर नऊ गावांमध्ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक कामे झाली आहेत.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...