Agriculture news in marathi;Water supply from dams in Khandesh has decreased | Agrowon

खानदेशात धरणांमधील पाण्याची आवक घटली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जळगाव  ः खानदेशातील रंगावली, अनेर, पांझरा हे प्रकल्प वगळता इतर मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची आवक मागील दोन दिवसांत घटली आहे. गिरणा धरणातील आवक मंगळवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता ३.३८ क्‍यूबिक मीटर प्रतिसेकंद एवढी होती. वाघूरमधील आवकही कमी झाली असून, या प्रकल्पांमधील जलसाठ्यात मंगळवारी फारशी वाढ झाली नाही.
 

जळगाव  ः खानदेशातील रंगावली, अनेर, पांझरा हे प्रकल्प वगळता इतर मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची आवक मागील दोन दिवसांत घटली आहे. गिरणा धरणातील आवक मंगळवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता ३.३८ क्‍यूबिक मीटर प्रतिसेकंद एवढी होती. वाघूरमधील आवकही कमी झाली असून, या प्रकल्पांमधील जलसाठ्यात मंगळवारी फारशी वाढ झाली नाही.
 
वाघूरमध्ये मंगळवारी सकाळी १.६१ क्‍यूबिक मीटर प्रतिसेकंद, अशी पाण्याची आवक होती. सोमवारी सकाळी या प्रकल्पातील साठा ३९.१६ टक्के एवढा होता. तर मंगळवारी सकाळी या प्रकल्पातील साठा ३९.६३ टक्के एवढाच झाला. अर्थातच २४ तासात या प्रकल्पाची जलपातळी फक्त ०.४७ टक्के एवढीच वाढ झाली.

गिरणा धरणातील साठा सोमवारी सकाळी ७३.०१ टक्के एवढा होता. तर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यातील पाण्याची टक्केवारी ७३.६४ टक्के एवढीच होती. ०.६३ टक्के एवढाच जलसाठा गिरणा धरणात गेल्या २४ तासात वाढला. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यातील हरणबारी व केळझर हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर चणकापूरमध्ये ६६.५० टक्के साठा आहे. या तिन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग घटविल्याने गिरणा धरणातील आवक कमी झाली आहे. गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊसही थांबल्याने आवक कमी झाली आहे. पाऊस न आल्यास आवक शून्यावर येईल, असे सांगण्यात आले. 

वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रातही पाऊस नाही. या प्रकल्पावर जळगाव, जामनेर शहरासह काही कारखान्यांना पाणीपुरवठ्याची मदार आहे. तसेच जळगाव, भुसावळ तालुक्‍यांतील शेतीलादेखील वाघूरमधून सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाते. 

जळगाव जिल्ह्यातील गूळ, धुळे जिल्ह्यांतील अनेर, पांझरा या प्रकल्पांमधील आवक बऱ्यापैकी आहे. पांझरा व अनेर नदीचा पूर ओसरला असला तरी नदीत पाण्याचा मोठा जलप्रवाह येत आहे. दोन्ही प्रकल्पांचे दरवाजे मंगळवारीदेखील उघडे होते. नंदुरबारमधील रंगावली प्रकल्पातही पाण्याची आवक कायम असून, नदीत पाण्याचा मोठा प्रवाह कायम आहे. 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...