नगर जिल्ह्यातील ६०५ पाणीपुरवठा योजना बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाणीपातळी वाढली नाही. धरणे काही प्रमाणात भरली असली तरी त्यातील पाणीसाठा वर्षभर टिकला नाही. परिणामी जिल्ह्यातील १४१९ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी ६०५ योजना उन्हाळ्यापूर्वीच बंद पडल्या. त्यातील ८५ टक्के पाणीयोजना या केवळ उद्‍भवास पाणी कमी असल्याने बंद आहेत. सुरू असलेल्या पाणीयोजना पुढील दोन महिने सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

नगर जिल्ह्यात दुष्काळाचा गंभीर फटका वेगवेगळ्या बाबतीत सोसावा लागत आहे. गावपातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी १४१९ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहेत. सर्वाधिक पाणी योजना संगमनेर तालुक्‍यात १७३ त्यानंतर पारनेर तालुक्यात १६९ आणि अकोले तालुक्यात १५७ आहेत. या योजनांपैकी ६०५ पाणी योजना उन्हाळ्यापूर्वीच बंद पडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतल्याने पंप नादुरुस्त किंवा थकीत वीजबिल या कारणांमुळे जिल्ह्यातील कोणतीही नळ पाणीपुरवठा योजना बंद नाही. ‘उद्‍भवास पाणी कमी’ हे ८५ टक्के योजना बंद होण्याचे कारण आहे.

कर्जत, पाथर्डी व त्यानंतर पारनेर या तालुक्‍यातील सर्वाधिक योजना बंद आहेत. या योजना बंद असल्यानेच जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले. सध्या जिल्ह्यात सव्वासातशेहून अधिक टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. पाणीपातळी खालावल्याने पाणी योजना बंद पडण्याचे प्रमाण पाथर्डी, कर्जत, पारनेरमध्ये अधिक आहे. 

उद्‍भवास पाणी कमी हेच कारण संगमनेर (४४), कोपरगाव (चार), राहाता (तीन), राहुरी (एक), नेवासे (२२), शेवगाव (१४), पाथर्डी (९८), पारनेर (८९) आणि कर्जत (११४) या नऊ तालुक्‍यातील बंद असलेल्या पाणी योजनांमागे केवळ `उद्भवास पाणी कमी' हे कारण आहे. श्रीरामपूर तालुक्‍यातील एक, नगर तालुक्‍यातील चार आणि श्रीगोंदे तालुक्‍यातील एक नळ पाणीपुरवठा योजना दूषित उद्भवामुळे बंद आहेत. अकोले तालुक्‍यातील सात, श्रीगोंदे तालुक्‍यातील आठ आणि जामखेड तालुक्‍यातील ११ पाणीयोजना या कायमस्वरूपी बंद आहेत.  

पाणीपुरवठा योजना स्थिती
तालुका  चालू योजना बंद योजना
अकोले   १३८   १९
संगमनेर  १२९ ४४
कोपरगाव  ८०  ०४
राहाता ५२   ०३
राहुरी   ५५  ०१
श्रीरामपूर  ८२ ०३
नेवासे २९  २२
शेवगाव १७ १४
पाथर्डी   ०६  ९८
नगर २६   ४९
पारनेर   ८० ८९
श्रीगोंदे ६३  ८२
कर्जत   १४   ११४
जामखेड  ३२  ६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com