तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणातील बहुतांशी भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील भारणे येथे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) पावसाची बहुतांशी भागात उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत आहे. सौराष्ट्र व परिसर समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती छत्तीसगडचा उत्तर भागात कमी दाबाचा असलेला पट्टा ओढून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पट्टा मध्य प्रदेशाच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात उद्या (ता. २५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर सावरडे येथे ८८, शिरगाव ८५, कोडगाव ८३, देवरूख ६८, शिरशी ६५, तुलसानी ६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर उर्वरित भागातही हलक्या सरी बरसल्या. तसेच ताम्हिणी, कोयना, शिरगाव, लोणावळा, वळवण, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी, अंबोणे, खोपोली, वाणगाव, ठाकूरवाडी या घाटमाथ्यांवरही पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील करंजफेन येथे ७८ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. आंबा येथे ७६, भोळावडे ६८, इगतपुरी ६२, शिवणे ५५, लोमआवळा ५२, निगुडघर, राधानगरी ५१ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरला असला तरी, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर औरंगाबाद जिल्ह्यांतील एखाददोन ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भातील झरी, दैठणा, टेंभुर्णी, जेवती, जिमगट्टा या ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या.

गुरुवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत कृषी विभाग) कोकण विभाग ः ठाणे ४२, नेरळ ६८.६, कडाव ४०, कळंब ६६, कशेले ४१, वौशी ४८, माणगाव ४२, गोरेगाव ४८, लोनेरे ५३, निजामपूर ५२, कोलाड ५०, पोलादपूर ४९, कोंडवी ४५, वाकण ५३, तला ४४, मेंढा ८०, चिपळूण ३८, खेरडी ५३, मरगतम्हाणे ५०, रामपूर ४५, वाहल ४०, सावरडे ८८, असुरडे ६०, शिरगाव ८५, दापोली ४०, बुरवंडी ४४, दाभोल ४९, अंजरला ४१, वाकवली ४५, पालगड ४५, खेड ४९, शिरशी ६५, अंबवली ६२, कुलवंडी ४७, भारने ९२, धामनंद ४२, मंडणगड ५६, म्हाप्रल ५०, देव्हरे ६१, टरवल ५२, कडवी ४२, अंगवली ५०, कोडगाव ८३, देवली ४२, देवरूख ६८, तुलसानी ६३, राजापूर ६०, भांबेड ५५, विलवडे ६०, बांडा ४८.

मध्य महाराष्ट्र ः बाऱ्हे ३३,५, मानखेड ३२.७, सुरगाणा ४२, इगतपुरी ६२, घोटी ४०, ताकेत ३१, धारगाव ३१, त्रिंबकेश्‍वर ३०, दाब ३९, माले ४१, मुठे ५१, भोलावडे ६८, आंबवडे ३२, निगुडघर ५१, काले ४०, खडकाळा ३२, लोणावळा ५२, शिवणे ५५, वेल्हा ४७, पाणशेत ४३, विंझर ३१, राजूर ४३, वाडा ४३, कुडे ३०, शिरसी २८, करंजफेन ७८, मलकापूर ३८, आंबा ७६, राधानगरी ५१, कडेगाव ३०, गवसे ३१.

मराठवाडा ः शेवळी १७, वाडीगोद्री १२, उस्मानाबाद शहर १२, बेंबळी १६, कासेगाव ११, भूम १७, वालवड १०, लोहारा १३, बारूळ ११.

विदर्भ ः झरी १२, दैठणा १५, टेंभुर्णी ११, जेवती १०.४, जिमलगट्टा १४.६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com