कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे  मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. आज  (ता. २७) कोकण, मध्य   महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत (ता.२९) पाऊस पडण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. २७) त्याची तीव्रता वाढणार आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळणार असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागात बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्यापासून (ता. २८) मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला होता. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, कोकणात दिवसभर ऊन - पावसाचा खेळ सुरू होता.

रविवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : मुरबाड ३७, न्याहडी ३१, खारबाव ३४, गोरेगाव ३५, कर्जत ४६, नेरळ ४६, कडाव ४३, कळंब ४६, कशेले ४८, वौशी ३६, खोपोली ३५, आटोने ४१, जांभूळपाडा ३२, पेण ३०, कसू ४०, कामरली ३३, महाड ४४, करंजवाडी ३२, खारवली ३४, तुडली ३६, माणगाव ५२, लोणेरे ३१, निझामपूर ३०, पोलादपूर ३३, कोंडवी ३७, वाकण ४६, मुरूड ३०, मार्गताम्हाणे ४६, रामपूर ४०, कळकवणे ३२, शिरगांव ८२, खेड ३२, शिर्शी ४२, भरणे ३६, दाभील ४०, तरवल ३९, लांजा ३१, विलवडे ३३, सांगवे ३२, जव्हार ३०, मोखडा ३६. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३८, धारगाव ३७, शेंडी ६३, पौड ४१, घोटावडे ४४, माले ५६, मुठे ७४, पिरंगूट ३९, निगुडघर ५५, खडकाळा ५१, लोणावळा ७१, शिवणे ३५, वेल्हा ३१, पानशेत ३५, राजूर ३२, बामणोली ४३, केळघर ४४, हेळवाक ५५, महाबळेश्‍वर ६०, तापोळा ६३, लामज ७८, आंबा ५२, राधानगरी ३०. मराठवाडा : शेलगाव १९, झरी १२, इतकूर १३. विदर्भ : बोराखेडी १२, किन्हीराजा १५, मुंगळा १५, शेलू बाजार १२, धानोरा २०, गिरोली १०, धारणी २२, धुळघाट १८, सावळीखेडा १५, चिखलदरा १२, सेमडोह १६, रिसेगाव १५, दिग्रस १०, सावळी १२, घोटी १२, पारवा १६, सडक अर्जुनी १४, पिसेवढथा १९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com