राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार पोचला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पोषक स्थिती नसल्याने तुरळक अपवाद वगळता राज्यात जवळपास आठवडाभरापासून पाऊस थांबला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पावसाने दडी मारल्यानंतर अनेक भागात मुख्यत : आकाश निरभ्र असल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने कमाल तापमानाचा पारा २६ ते ३३ अंशांच्या दरम्यान आहे. बहुतांशी ठिकाणी २० ते २५ अंश किमान तापमानाची नाेंद होत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशाकडे सरकणारी ही प्रणाली तीव्र होत अाहे. यामुळे पश्‍चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. तर मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याने दक्षिण भारतातील राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार आहे.

राज्यात रविवारपर्यंत (ता. ९) कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बुधवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.८, नगर ३३.२, जळगाव ३१.६, कोल्हापूर २८.२, मालेगाव २६.२, नाशिक २६.४, सांगली ३०.०, सातारा २६.५, सोलापूर ३२.३, सांताक्रुझ ३१.२, अलिबाग ३०.६, रत्नागिरी २९.०, डहाणू ३१.०, आैरंगाबाद २७.९, परभणी ३२.०, नांदेड ३१.०, अकोला ३१.४, अमरावती २७.६, बुलडाणा २७.४, चंद्रपूर ३२.२, गोंदिया ३०.०, नागपूर ३०.९, वर्धा ३०.०, यवतमाळ २९.५.

बुधवार (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : हमारपूर २४, सावर्डे ३६, कळकावणे २५, शिरगाव २८, कडवई २३, सवंडल २४, पाचळ २५, अंबोली ३८. मध्य महाराष्ट्र : पेठ २३, भोलवडे २२, महाबळेश्‍वर २४, तापोळा २८, लामज ३४, करंजफेन २१, आंबा ३९. मराठवाडा : बीड २५, राजूरी २३, अंबाजोगाई ३५, बर्दापूर २६, पानगाव २०, घोणशी २०, वाशी २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com