कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : राज्याच्या उत्तरेकडील काही भागातून मॉन्सून परतला अाहे. शनिवारपर्यंत (ता. ६) राज्याच्या आणखी काही भागातून मॉन्सूनची माघार शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडत आहे. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

मॉन्सूनने २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. बुधवारी (ता. ३) नंदुरबार, धुळे, जळगाव, गोंदिया या जिल्ह्यांसह राज्याच्या उत्तरेकडील काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. शुक्रवारपर्यंत बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या अाणखी काही भागातून माॅन्सून परतण्याची शक्यता आहे.  

गुरवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत : कृषी विभाग) : कोकण : महाड २७, करंजवाडी ३२, नाटे २८, खारवली ४०, तुडील ३९, माणगाव ५५, इंदापूर ३०, गोरेगाव ४२, लोणेरे ३९, निझामपूर ४०, पोलादपूर ५१, कोंडवी २१, वाकण २९, श्रीवर्धन ५०, म्हसळा २४, तळा ४०, मेंढा ३५, सावर्डे २३, कळकवणे ३८, शिरगाव ४२, फणसावणे २३.

मध्य महाराष्ट्र : नाणशी २३, जोगमोडी २२, पांडुर्ली २१, थेरगाव २०, पिरंगुट २०, भोलावडे २१, डिंगोरे २२, पणदरे ३०, वडगाव २६, इंदापूर २८, लोणी २०, बावडा २३, काटी २०, निमगाव २६, अंथुर्णी ५०, सणसर २४, मुत्सी ३९, निंबार्गी २०, करजगी २०, सातारा २५, खेड २७, वर्ये ६०, कण्हेर ४५, वडूथ २०, जावळी ६१, आनेवाडी ४५, कुडाळ ३२, बामणोली ३९, केळघर ५३, करहर ४९, मरळी २२, मोरगिरी २०, कुठरे २१, कवठे २१, काले ३२, शेणोली २१, कोरेगाव २१, कुमठे २२, वाठार-किरोली २०, किन्हई ६०, खटाव २७, पुसेगाव ५४, बुध ३७, वडूज ४३, मायणी २४, दहिवडी ३६, मलवडी ६०, मार्डी २५, शिंगणापूर २१, फलटण २६, आसू २२, राजाळे ३५, तरडगाव ५५, खंडाळा ३९, वाठार-बु २०, लोणंद ४७, वाई ६५, पसरणी ३५, ओझर्डे ४१, महाबळेश्‍वर ३५, पाचगणी ३९, तापोळा २७, लामज ३८, वीटा ४१, कुरळप ६०, बहे ३५, मणेराजूरी २२, शिरसी ५७, सागाव २०, अंकलखोप २६, नेवरी ४०, चिंचणी ४२, गवसे २७. मराठवाडा : मातोळा १५, भादा २४, बेलकुंड १५, औराद २०, अांबुलगा ४०, उमरगा ८१, डाळींब २४, मुरूम २१.   अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत अरबी समुद्रातील लक्षद्वीप आणि मालदीव बेटांजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आज (ता. ५) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याची तीव्रता वाढून ‘चक्रीवादळ’ तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली ओमानच्या दिशेकडे जाणार असल्याने पश्‍चिम किनाऱ्यावर फारसा प्रभाव जाणावणार नाही. मात्र उद्यापासून (ता. ६) समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com