नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
अॅग्रो विशेष
हुडहुडीत वाढ; राज्याच्या किमान तापमानात घट
पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २४) नगर येथे तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होत राज्यातील नीचांकी १२.४ अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. २८) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान निवळून गेल्याने राज्यात निरभ्र आकाश आहे. यातच अरबी समुद्र आणि परिसरामध्ये असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे येऊ लागली अाहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी तापमानात घट झाली असून, धुके पडत अाहे. नगरपाठोपाठ पुण्यात १२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली आले आहे. विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. गाेंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान सरासरीच्या खाली घसरले अाहे.
शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.७ (२), नगर १२.४ (-२), जळगाव १६.० (२), कोल्हापूर १९.७ (३), महाबळेश्वर १५.८ (२), मालेगाव १७.२ (४), नाशिक १४.१ (२), सांगली १६.७ (१), सातारा १५.७(०), सोलापूर १८.१(१), सांताक्रूझ २०.४ (०), अलिबाग २०.९(१), रत्नागिरी २१.९(१), डहाणू २३.०(३), आैरंगाबाद १४.४(१), परभणी १७.२ (१), नांदेड १५.५(१), उस्मानाबाद १६.०, अकोला १५.९(०), अमरावती १६.८(०), बुलडाणा १६.४ (०), चंद्रपूर १७.६(३), गोंदिया १४.१(-१), नागपूर १३.६(-१), वर्धा १५.०(-१), यवतमाळ १४.४ (-१).
- 1 of 675
- ››