परभणी १०.२, तर नगर १०.४ अंश सेल्सिअस
परभणी १०.२, तर नगर १०.४ अंश सेल्सिअस

परभणी १०.२, तर नगर १०.४ अंश सेल्सिअस

पुणे  : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने राज्याच्या तापमानातही घट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात सर्वदूर गारठा वाढला असून, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गुरुवारी (ता. २९) नीचांकी १०.२ अंश तापमानाची नोंद झाली. नगर येथे राज्यातील १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

तमिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत वादळी स्थिती असून, समुद्र खवळल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र कोरडे हवामान असून, गारठा वाढला आहे. विविध भागात धुकेही पडत असल्याने पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. नगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, वर्धा येथे तापमान १२ अंश आणि त्यापेक्षा खाली घसरले आहे. मंगळवारपर्यंत (ता. ३) राज्यात थंड व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.  

गुरुवारी (ता. २९) राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.०(-१), नगर १०.४ (-३), जळगाव १३.०(-१), कोल्हापूर १६.६(०), महाबळेश्‍वर १४.० (०), मालेगाव १५.० (२), नाशिक ११.३ (-१), सांगली १३.० (-२), सातारा १३.७(-१), सोलापूर १६.६(०), सांताक्रूझ १९.४ (०), अलिबाग २०.३(१), रत्नागिरी १९.९ (-१), डहाणू २०.३ (१), औरंगाबाद ११.० (-२), परभणी १३.० (-२), नांदेड १५.० (१), उस्मानाबाद १४.६, अकोला १४.० (-२), अमरावती १४.० (-३), बुलडाणा १५.४ (-१), चंद्रपूर १५.४(१), गोंदिया १३.७ (-१), नागपूर १२.१ (-२), वर्धा १२.५ (-३), यवतमाळ १३.४ (-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com