जळगाव जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले

जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले
जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले

जळगाव : नियोजन समितीच्या निधीचे नियोजन  मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच यंदाही रखडण्याची स्थिती अाहे. हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामांचे नियोजन करावे, तसेच नियोजनाच्या अधिकाराबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य करीत आहेत.

जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून १२० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यात नागरी सुविधा, जनसुविधा, अंगणवाडी बांधकाम, लघुसिंचन, शाळा दुरुस्ती, रस्ते बांधकाम व इतर कामे करायची आहेत. त्याचे नियोजन करून त्यासंबंधी सर्वसाधारण सभेत परवानगी घ्यायला हवी होती. सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्‍यता नसल्याने हे नियोजनच बारगळले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कुठल्याही कामासंबंधी मंजुरी घेता आली नाही. यावरून सभेत वादही झाले. सत्ताधारी एकत्र नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत. एकच पदाधिकारी कसे नियोजन करू शकतो. सर्वांना बोलवा, नियोजन करा आणि निधीचे समान वाटप करा, अशी सदस्यांची मागणी आहे.

पदाधिकाऱ्यांनी नियोजनासाठी वेळ दिला नाही. प्रशासनाने कामांच्या याद्या प्राथमिक स्वरूपात तयार केल्या आहेत. त्यांना सर्वांसमोर मंजुरी देऊन पावसाळ्यानंतर तातडीने कामे सुरू करावीत, अशी मागणी सदस्य गोपाल चौधरी आणि  शशिकांत साळुंखे यांनी केली आहे. निधी खर्चाचे नियोजन करा शाळा दुरुस्ती, रस्ते विकास आदी कामांचे नियोजन करून निधी खर्च व्हावा. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापुर्वी निधी खर्चाचे पूर्ण नियोजन मार्गी लावा. अन्यथा मंजुऱ्या, उद्‌घाटन अशी कार्यवाही करता येणार नाही. असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com