यवतमाळ जिल्ह्यात एक हजार कोटींचे कर्जवाटप 

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला पीक कर्जवाटपाचा विषय प्रशासनाने सातत्याने लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे जिल्ह्याने पीक कर्जवाटपाचा एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे.
One thousand crore loan disbursement in Yavatmal district
One thousand crore loan disbursement in Yavatmal district

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला पीक कर्जवाटपाचा विषय प्रशासनाने सातत्याने लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे जिल्ह्याने पीक कर्जवाटपाचा एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. 

खरीप हंगाम २०२०-२१ करीता जिल्ह्याला २१८२. ५२ कोटींचे उद्दिष्ट आहे. हे कर्जवाटप साधारण: सप्टेंबरपर्यंत सुरू असते. मात्र, यावर्षी कर्ज वाटपाला सुरुवात होताच एक महिन्याच्या आत जिल्ह्यात ४७ टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांच्या एकूण २६६ शाखा आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९४ शाखा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४५ शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या २६ शाखा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या २३ शाखा आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या १९ शाखा तसेच इतर बँकांच्या शाखेचा समावेश आहे. 

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात २ लक्ष ९८ हजार ९३३ सभासद शेतकरी कर्जवाटपासाठी पात्र आहेत. यापैकी १० जुलै २०२० पर्यंत १ लक्ष ३० हजार ३६० शेतकऱ्यांना एक हजार चार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७५१२५ शेतकऱ्यांना ४४७.३९ कोटींचे वाटप (८१.६३ टक्के), स्टेट बँक ऑफ इंडियाने ३२७७६ शेतकऱ्यांना ३२२ कोटींचे वाटप (५४.०७ टक्के), सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ५९९६ शेतकऱ्यांना ५१.३० कोटींचे वाटप केले असून इतरही बँकांचा यात वाटा आहे. 

विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करणे, बँकामध्ये गर्दी होऊ न देणे आदी सूचनांचे पालन करून बँकांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांचे कौतुक केले आहे. मात्र, उर्वरित पीक कर्जवाटप सुद्धा बँकांनी त्वरीत करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गतवर्षी संपूर्ण हंगामात जिल्ह्यात केवळ ६१ टक्के खरीप पीक कर्जवाटप झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com