agriculture news in marati, water scaricity in tasgaon, sangli, maharashtra | Agrowon

येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018
तासगाव, जि. सांगली : तासगाव तालुक्‍यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, येरळा काठच्या गावांमध्ये पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. येरळ्यात पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन आठ दिवस झाले, मात्र येरळ्यात पाणी सोडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे शेकडो एकर बागायत शेती ऐन उन्हाळ्यात धोक्‍यात आली आहे. दुर्दैवाने राजकीय पातळीवरून मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. 
 
तासगाव, जि. सांगली : तासगाव तालुक्‍यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, येरळा काठच्या गावांमध्ये पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. येरळ्यात पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन आठ दिवस झाले, मात्र येरळ्यात पाणी सोडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे शेकडो एकर बागायत शेती ऐन उन्हाळ्यात धोक्‍यात आली आहे. दुर्दैवाने राजकीय पातळीवरून मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. 
 
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येरळा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी चार दिवस येरळा पात्रात उपोषण केल्यानंतर महसूल प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास लावले. मात्र महसूल अथवा पाटबंधारे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. परिणामी, दिवसेंदिवस येरळाकाठची स्थिती गंभीर होत आहे.
 
येरळा नदीत पाणी नसल्याची झळ आता काठावरील गावांना बसू लागली आहे. या नदीतून पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे, मात्र गेली दोन वर्षे बलवडी बंधाऱ्याखाली पाणीच येत नाही अशी स्थिती आहे. या वर्षी तर आरफळचे एक दिवस सोडलेले पाणी वगळता पावसाच्या पाण्याशिवाय पाणीच येरळ्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या येरळाकाठच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी येरळ्यातून पाणीपुरवठा योजना करून करून पाणी दूर अंतरावर नेले आहे. तेही आता अडचणीत आले आहेत. 
 
येरळा नदीत पाणी नसल्याने काठावरील द्राक्षबागांना पाणी कमी पडू लागले आहे. छाटण्यानंतर पाण्याची आवश्‍यकता असते. मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. येरळ्यात तातडीने पाणी सोडावे अन्यथा आंदोलनाचा इशारा आता शेतकरी देऊ लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...