agriculture news in maratthi Major IAS transfers in Maharashtra Agriculture commissioner transtered to PMRDA | Agrowon

कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड पुन्हा साखर आयुक्त 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण बदल्या करत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. यात प्रामुख्याने कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची पुन्हा साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण बदल्या करत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. यात प्रामुख्याने कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची पुन्हा साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. श्री.दिवसे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या कृषी आयुक्त पदावर आता कुणाची वर्णी लागते राज्याचे लक्ष लागले आहे. 

राज्य सरकारचे बदल्यांचे सत्र सध्या सुरू आहेत. यात शनिवारी पुन्हा आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची एमएमआरडीच्या मुख्य कार्यकारीपदी बदली करण्यात आली असली, तरी नव्या आयुक्तांची घोषणा करण्यात आलेली नाही. तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

याशिवाय पीएमआरडीएचे विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र दुडी यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...