agriculture news in marthi, agitation of sugar factories workers for demands, pune, maharashtra | Agrowon

मागण्यांसाठी साखर कामगारांचा पुण्यात मोर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पुणे  ः साखर कामगारांसंबधी त्रिपक्षीय वेतन समितीचे गठन सरकारने येत्या पंधरा दिवसांत करावे. साखर कामगारांची उपासमार सुरू असून, सरकाराने हा प्रश्‍न त्वरित निकाली काढवा, अन्यथा येत्या गाळप हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साखर कामगारांनी दिला.  

पुणे  ः साखर कामगारांसंबधी त्रिपक्षीय वेतन समितीचे गठन सरकारने येत्या पंधरा दिवसांत करावे. साखर कामगारांची उपासमार सुरू असून, सरकाराने हा प्रश्‍न त्वरित निकाली काढवा, अन्यथा येत्या गाळप हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साखर कामगारांनी दिला.  

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी साखर आयुक्तालयावर बुधवारी (ता. २८) मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, मंडळाचे राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले, कॉ. सुभाष काकुस्ते, राज्य कार्याध्यक्ष राऊ पाटील, राज्य उपाध्यक्ष अशोक बिराजदार, डी. बी. मोहिते, खजिनदार रावसाहेब भोसले, राजेंद्र तावरे, सुरेश मोहिते, नितीन बेनकर यांच्यासह राज्यभरातील साखर कामगार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाच प्रतिनिधींनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना या वेळी मागण्यांचे निवेदन दिले.  

या वेळी तात्यासाहेब काळे म्हणाले, की साखर कामगारांच्या वेतनाबाबतच्या त्रिपक्षिय समितीची मुदत संपून पाच महिने झाले आहे. तरी अजूनही नवी समितीची निवड झालेली नाही. सरकारने नवीन समिती गठीत करून कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत. साखर कामगारांचे थकीत वेतन, बंद पडलेल्या साखर कामगारांचे प्रश्‍न गंभीर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने हा मोर्चा काढला आहे. यातूनही सरकारने भूमिका न घेतल्यास येत्या विधानसभेच्या वेळी कामगारांची ताकद दाखवून देऊ. 

साखर कामगारांचे प्रश्न माझ्या अखत्यारित येत नसून ते कामगार आयुक्तांच्या अंतर्गत आहे. कामगारांचे निवेदन कामगार आयुक्तांपर्यंत पोहोचवून साखर कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वेळी सांगितले.
 
या आहेत प्रमुख मागण्या 

  • साखर व जोडधंद्यातील कामगारांना वेतन व सेवाशर्ती ठरविण्याबाबत तातडीने त्रिपक्षीय समिती गठीत करावी. 
  • अंतिम निर्णय होईपर्यत साखर उद्योगातील कामगारांना पाच हजार रुपयांची अंतरिम वाढ द्यावी. 
  • साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांना अकुशल कामगारांच्या वेतानाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे. 
  • साखर उद्योगाताली कामगारांचे थकीत वेतन मिळण्यासाठी शासनाने वेगळा निधी उभारावा व थकीत वेतन मिळवून द्यावे. खासगी साखर कारखान्यांमधील कामगारांना वेतनवाढीच्या करारानुसार वेतन द्यावे. 
  • बंद पडलेल्या साखर कारखान्यांतील कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत. 
  • शासनाने योग्य त्या उपाययोजना करून साखर उद्योगातील कामगारांचे इतर चालू कारखान्यांमध्ये पुनर्वसन करण्यात यावे. 
  • एकतर्फी राज्य कामगार संघटनेस विचारात न घेता करीत असलेल्या आकृतिबंध आम्हाला मान्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक संघटना व कारखाना यांच्यामध्ये चर्चा करूनच अंतिम आकृतिबंध तयार करण्यात यावा. 
  • साखर उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांना सात हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...