Agriculture news in marthi; Demand for Deputy Collector, Ramdas Khedkar by State Farmers' Sabha for Nashik | Agrowon

संपूर्ण कर्जमुक्तीसह वीजबिल माफ करा : किसान सभा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जून 2019

नाशिक : दुष्काळी परिस्थिती आणि शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीसह वीजबिल माफ करावे, यांसह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा समितीने केल्या आहेत.

नाशिक : दुष्काळी परिस्थिती आणि शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीसह वीजबिल माफ करावे, यांसह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा समितीने केल्या आहेत.

किसान सभेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विविध मागण्यांसाठी दोन वर्षांपूर्वी १ जून रोजी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन करून संप केला. त्या वेळी सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबविण्यात आले. मात्र, आजपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नसल्याने सरकारचे लक्ष वेधले आहे.

जिल्हा बँक अडचणीत सापडली असून, पीक कर्जवाटपासाठी बँकेला अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, जिल्ह्यातील विविध कार्यकारी विकास सोसायट्या तसेच बँक व सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आदी मागण्या किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे, जिल्हा सचिव देविदास भोपळे, प्रा. के. एन. आहिरे, विजय दराडे यांच्यासह शिष्टमंडळाने केल्या आहेत.

जिल्ह्यातील अनेक उपसा जलसिंचन संस्थाना पाण्याचा थेंब मिळालेला नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा आहे. सरकारने जळगाव जिल्ह्यातील जलसिंचन उपसा संस्थांना कर्जमाफी देऊन पुन्हा अनुदान दिले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील जलसिंचन उपसा संस्थांना २००८ व २०१७ मध्ये झालेल्या कर्जमाफीत समावेश केलेला नाही, असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या 

  • संपूर्ण कर्जमुक्तीसह वीजबिल माफ करावे.  
  • जिल्ह्यातील उपसा जलसिंचन संस्थांचे कर्ज माफ करा.  
  • जिल्हा बँकेला अडीच हजार कोटींची कर्ज उपलब्ध करून घ्या.   
  • आदिवासी कसत असलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर करून द्या.   
  • शेतकरी आंदोलकांवरील दोन वर्षांतील गुन्हे मागे घ्या.   
  • दुष्काळी भागात जनावरांच्या चारापाण्याची सोय करावी.  
  • सुरगाणा, पेठ तालुक्यांतील पावसाचे पाणी दुष्काळी भागात महाराष्ट्राला मिळावे.  
  • नांदगाव व चांदवड तालुक्यांत मांजरपाडामधून १ मधून नारपारचे पाणी समन्यायी पद्धतीने मिळावे. 

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...