नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प अहवाल सादर

नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प अहवाल सादर
नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प अहवाल सादर

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिक मेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने सादर केला आहे. त्याची पडताळणीदेखील करण्यात आली असून, आता महापालिका आणि म्हाडाच्या मतप्रदर्शनानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याच्या विकासकामांच्या आढाव्यासाठी बैठक घेतली होती. त्या वेळी नाशिक महापालिकेची स्वतंत्र बैठक घेताना शहरातील वाहतूक व बससेवेचा आढावा घेतला होता. त्याचवेळी त्यांनी नाशिककरांसाठी मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. नाशिककरांसाठी बससेवा किंवा इतर वाहतुकीच्या बाबतीत अडचणी असताना मेट्रोसेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर ही घोषणा पूर्ण होईल की नाही अशी शंका व्यक्त केली होती. मात्र आता त्यानंतर काही बैठकाही झाल्या आणि आता १८०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवालच मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सादर केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा महामेट्रो हा संयुक्त उपक्रम असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यानंतर आता नाशिक शहरात हे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो हा एक प्रभावी उपाय असून ८० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. त्यासाठी दोन ट्रॅकचा २८ किलोमीटर एलीव्हेटेड कोरिडोर असेल. रूळ ऐवजी रबर टायरचा वापर असलेली ही मेट्रो विजेवर चालेल. मेट्रो हे सार्वजनिक वाहतुकीसाठी अलीकडच्या काळात सर्वांत प्रभावी आणि माफक खर्चातील साधन आहे. पारंपरिक वाहतूक साधनाच्या तुलनेत हे वेगळे साधन नाशिककरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com