agriculture news in marthi State government should take immediate decision to compensate demands Devendra Fadnavis | Page 3 ||| Agrowon

राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय घ्यावा : देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी श्री. फडणवीस बुधवारी (ता. १) नागपुरात आले. त्या वेळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. 
श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा राज्याचे प्रमुख किंवा मंत्री नैसर्गिक आपत्तीच्या पाहणीसाठी जातात, तेव्हा प्रशासन वेगाने कामाला लागते. मी आणि प्रवीण दरेकर उद्यापासून वाशीम जिल्ह्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत जाणार आहोत आणि परिस्थिती पाहून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ 

सरकारच्या घोषणा हवेत विरल्या... 
यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. जेवढ्या आपत्ती आल्या त्या संदर्भातल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ सर्व आपत्तीच्या वेळेला सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...