शिराळ्यात नागप्रतिमेची पूजा

शिराळ्यात नागप्रतिमेची पूजा
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजा

शिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत नागपूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग पाचव्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरड घालत बुधवारी (ता. १५) जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा केली. जिवंत नागपूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु युवा वर्गाने अत्यंत संयमाने दिवसभर अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी उत्साहात साजरी केली.

बुधवारी (ता. १५) सकाळी सहापासून नागमंडळे प्रतीकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वन विभागाच्या वतीने साप: अंधश्रद्धा व गैरसमज याविषयी व भित्तिपत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात आले.

नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. दुपारी महाजनांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून पालखी अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. शिराळा आगाराच्या वतीने ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विद्युतपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने पथके नेमली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com