agriculture NEWS stories in marathi, New technology developed for Ethanol mixing | Agrowon

इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे तंत्र

वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक कार्यक्षम व हरित इंधनांच्या निर्मितीसाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. ॲरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधकांनी इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याचे योग्य तंत्र विकसित केले आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक कार्यक्षम व हरित इंधनांच्या निर्मितीसाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. ॲरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधकांनी इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याचे योग्य तंत्र विकसित केले आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

२०१७ मध्ये अमेरिकेतील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनापैकी सुमारे ३० टक्के उत्सर्जन हे वाहतुकीमुळे होते. वाहतुकीतील हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहनातील बदलासोबतच इंधनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सध्या पारंपरिक इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याचा एक पर्याय पुढे येतो. इथेनॉल तुलनेने स्वस्त असून, त्यामुळे पिकांच्या अवशेष विल्हेवाट लावण्याची समस्याही सोडवता येईल. मिश्रणाचे प्रमाण ठरवण्यासाठी यासाठी ॲरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील आंतरशाखीय संशोधकांनी प्रयोग केले आहे. त्यांच्या अभ्यासातून हे मिश्रण सुधारित पद्धतीने केल्यास हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये ४० ते ९६ टक्के इतकी घट होऊ शकते. या संशोधनामुळे हवाई इंधन, जहाजाचे इंधन, मोठ्या आकाराचे ट्रक आणि एकूण माल वाहतुकीच्या इंधनासाठी फायदा होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासोबतच माल वाहतुकीचा खर्चही कमी होऊ शकेल.

प्रक्रियातंत्र आणि मोजमाप ः

  • इथेनॉलच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक प्रक्रिया विकसित केली आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये असलेल्या तीन टप्प्यांचे एकत्रीकरण केले आहे. या प्रक्रियेला कन्सॉलिडेटेड अल्कोहोल डिहायड्रेशन ॲण्ड ऑलिगोमरायझेन (CADO) असे म्हणतात. या प्रक्रियेचे तांत्रिक, आर्थिक परिणामांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
  • या प्रक्रियेच्या अभ्यासासाठी संशोधकांनी हरितगृह वायू, नियंत्रित उत्सर्जन आणि वाहतुकीतील ऊर्जावापर यांचे एक प्रारूप तयार केले. त्याला ग्रीट प्रारूप (GREET model) नाव दिले. ते वेगवेगळ्या वाहनांची किंवा इंधनाचे विश्लेषण करते. इंधनातून कोणते घटक उत्सर्जित होतात, याचे मापन करते. त्याद्वारे ऊर्जेचा वापर आणि उत्सर्जनाची पातळी मोजता येत असल्याचे संशोधक मायकेल वांग यांनी सांगितले.
  • या तंत्राद्वारे इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे (उदा. मका आणि ऊस, त्यांच्या टाकाऊ भाग) विश्लेषण केले. निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या शेतीमालानुसार होणारे बदल मोजण्यात आले. या विश्लेषणातून वांग आणि बेनाविड्स यांनी CADO प्रक्रियेने तयार केलेल्या हायड्रोकार्बन मिश्रणामुळे हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये ४० ते ९६ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. ही घट प्रामुख्याने त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्चा माल व रूपांतरण प्रक्रियेवर अवलंबून असते.

ही घट कच्च्या मालाप्रमाणे अशी होती ः

मका दाणे ४० टक्के
उसाचा रस ७० टक्के
उसाचा किंवा मका कडब्याचा चोथा ७० ते ९६ टक्के
 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
सौर कृषिपंप योजनेच्या कामांना वेग द्या...सोलापूर : ‘‘एचव्हीडीएस आणि मुख्यमंत्री सौर...
युवकांनो शेतमाल विक्रीचे नियोजन करा :...जालना : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विकेल तेच...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र...नाशिक  ः ‘‘आदिवासी बांधवांना रोख...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
काकडा परिसरात बाधित क्षेत्राला...काकडा, जि. अमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...