agriculture newsin marathi doctors also affected by corona | Agrowon

डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 एप्रिल 2020

नवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच आता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही भेडसावू लागले आहे. त्यामुळे संसर्ग चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचीही संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच आता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही भेडसावू लागले आहे. त्यामुळे संसर्ग चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचीही संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. याचा परिणाम कोरोनाशी लढण्याच्या योजनेवर होणार असल्याने केंद्राचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे, या वाढत्या चाचण्यांच्या मुळाशी दक्षतेऐवजी भीतीची भावना असल्यास राज्यसरकारांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे, असा सल्लाही केंद्राने दिला आहे.

कोरोना संक्रमणग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांनाही लागण झाल्याचे प्रकार वाढले आहेत. कालच येथील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह १०८ जणांना कोरोना रुग्णांशी आलेल्या संपर्कामुळे विलगीकरण केंद्रात जावे लागले होते. अशीच काही उदाहरणेही समोर आली आहेत. एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या पत्नीने खोकल्यामुळे सीटीस्कॅन केल्यानंतर ही चाचणी घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने थेट विलगीकरण कक्ष गाठला. त्याची खात्री पटविण्यासाठी संबंधित डॉक्टरांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सुटकेचा निःश्वास टाकला.

अन्य एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांनीही स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. तत्पूर्वी ते एकांतवासात गेले होते. एवढेच नव्हे तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात न येणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी देखील स्वतःची कोरोना चाचणी करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही थकवा, कणकण, किरकोळ ताप असलेल्या डॉक्टरांकडून कोरोना चाचणी करून घेण्याचे प्रकार वाढले असल्याचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. अर्थात, कोरोनाचे जगभरात पसरलेले भय आणि संक्रमणाचा वाढलेला धोका यामुळे अशा चाचण्या होणे स्वाभाविक असल्याची पुस्तीही या डॉक्टरांनी जोडली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...