विदर्भात आज हलक्या पावसाचा अंदाज

विदर्भात आज हलक्या पावसाचा अंदाज
विदर्भात आज हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. १६) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे.  चंद्रपुरमधील ब्रह्मपुरी आणि परभणी येथे दोन दिवसांपूर्वी पारा ४० अंशांच्या पुढे जात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी (ता. १५) ब्रह्मपुरी येथे तापमान ३९.४ अंशांवर आले होते. तर, सोलापूर, परभणी, अमरावती, चंद्रपूर येथे तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक होते. यातच वातावरणाच्या खालच्या स्तरात होत असलेला वाऱ्यांचा संगम आणि वरच्या थरातील उपयुक्त स्थितीमुळे यामुळे मेघगर्जना आणि विजांच्या निर्मितीसाठी पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उद्या (ता. १७) चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची अंदाज आहे.    शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ,घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.९ (-०.३), कोल्हापूर ३६.५ (१.२), महाबळेश्वर ३१.८ (१.४), मालेगाव ३५.२ (-१.३), नाशिक ३१.८ (-३.०), सांगली ३७.२ (०.८), सातारा ३५.६ (०.८), सोलापूर ३८.९ (१.७), अलिबाग ३०.१ (-०.७), डहाणू २८.७ (-२.३), सांताक्रूझ ३०.६ (-२.३), रत्नागिरी ३१.७ (०.०), औरंगाबाद ३४.६ (-०.७), बीड ३७.५ (१.४), नांदेड ३७.५ (१.०), परभणी ३८.२ (१.६), अकोला ३७.१ (०.४), अमरावती ३८.२ (१९.२), बुलडाणा ३३.४ (२०.८), बह्मपुरी ३९.४ (३.५), चंद्रपूर ३८.२ (१.२), गडचिरोली ३७.२, गोंदिया ३४.८ (-०.५), नागपूर ३६.७ (०.९), वर्धा ३६.८ (१.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com