agriculture stories in marath change in farming should be done in climate change | Agrowon

हवामानबदलाच्या स्थितीत शेतीमध्ये बदल आवश्यक

सौ. दीपाली मुटकुळे, सौ. अमृता कदम
रविवार, 1 डिसेंबर 2019

सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या तापमानामध्ये ०.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. त्यात १९९८ हे २० व्या शतकातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे मांडताना १९९८ पासून पुढे जागतिक तापमानामध्ये वेगाने वाढ होत असल्याचेही नमूद केले आहे. अशा वाढत्या तापमानाच्या स्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि शरीरशास्त्रीय क्रियांवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्याचा विचार भविष्यातील शेतीसाठी करणे आवश्यक आहे.

सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या तापमानामध्ये ०.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. त्यात १९९८ हे २० व्या शतकातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे मांडताना १९९८ पासून पुढे जागतिक तापमानामध्ये वेगाने वाढ होत असल्याचेही नमूद केले आहे. अशा वाढत्या तापमानाच्या स्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि शरीरशास्त्रीय क्रियांवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्याचा विचार भविष्यातील शेतीसाठी करणे आवश्यक आहे.

वाहनांची वाढती संख्या, कारखाने, घर किंवा कार्यालयांमध्ये वातानुकूलनाच्या यंत्रणा यातून मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत आहे. वाहने आणि कारखान्यांतून होणारे कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन, पशुपालनातून मिथेन वायुचे उत्सर्जन, शेतामध्ये होणारा नत्रयुक्त खतांचा वाढता वापर यामुळे होणारे नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन सातत्याने वाढत आहे. एका बाजूने वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत असताना कार्बनडाय ऑक्साइड शोषण करणारी वने, जंगले वेगाने कमी होत आहेत. आशिया खंडातील ६० दशलक्ष हेक्टर जंगले मानवाद्वारे नष्ट केली गेली आहेत. हवेतील कार्बनडाय ऑक्साइड वायू सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा व उष्णता धरून ठेवतो. परिणामी पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. या प्रक्रियेला जागतिक तापमानवाढ असे म्हणतात.

हवेचे तापमान वाढल्यानंतर हवेचा दाब कमी होतो. वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो. या प्रक्रियेमध्ये बाष्पही वाहिले जाते आणि हवेचे दाब कमी असलेल्या ठिकाणी पाऊस आणि अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढते. ज्या ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी राहते, तिथे हवेचे दाब वाढतात. परिणामी दुष्काळी परिस्थिती ओढवते. या अतिवृष्टी किंवा दुष्काळी स्थिती या दोन्ही स्थितीमध्ये पिकांचे नुकसान होते. अशा बाबी अलीकडे सातत्याने होताना दिसत आहेत. काही कालावधीत उदा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात होणारी गारपीट आणि पाऊस यामुळेही नुकसान होत आहे. या स्थितीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना किंवा व्यवस्थापनामध्ये बदल करता येतील, याचा विचार करू.

पर्यायी शेती व्यवस्थापन ः

पीक पद्धतीत बदल :
कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून तिथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करावा. महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. या पारंपरिक पिकामध्ये बी.टी. तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, विद्राव्य खतांचा वापर यामुळे उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वाढ मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कापूस पिकाचा कालावधी ७ ते ७.५ महिन्याचा आहे. आपल्याकडील मॉन्सूनचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे पाऊसमान आणि कपाशीचा कालावधी जुळत नाही. त्यातच कपाशीचे ९४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कपाशीच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाऊस किंवा सिंचन शक्य न झाल्याने कपाशीची महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता केवळ २.९३ क्विंटल प्रति हेक्टर इतकी कमी आहे. उत्पादनाचा खर्च वाढत असताना उत्पादकता कमी राहत असल्याने कपाशी उत्पादकांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ होत आहे. राज्यातील कपाशीखालील ४० लाख हेक्टर क्षेत्रांपैकी २० ते ३o लाख हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे.

रुंद वरंबा व सरी पद्धतीचा वापर :
मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा- सरी पद्धतीचा वापर वाढविणे गरजेचे आहे. या पद्धतीने सोयाबीन व घेवडा या दोन्ही पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यातून हेक्टरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे :
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे तयार करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याचा आकार ठेवावा. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड व पाट टाकावेत. त्यामुळे कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात. या वाफ्यात पावसाचे पाणी मुरते. योग्य ओलीवर पेरणी केल्यास पुन्हा होणाऱ्या पावसाचे पाणी ज्वारीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीने हेक्टरी उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ होत असल्याचे प्रयोगांचे निष्कर्ष आहेत. ही मूलस्थानी जलसंधारणाची पद्धत रब्बी ज्वारीसाठी उपयुक्त आहे.

रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे :
हरभरा हे कमी पावसावर व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. जिथे दोन पाणी उपलब्ध असतील, तेथे बागायत हरभऱ्याची लागवड करावी. तर कोरडवाहू हरभऱ्याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी मुरून हरभऱ्याची उत्पादकता वाढेल.

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब :
सिंचनासाठी ठिबक सिंचन वापरल्यास पाणी वापरामध्ये ५० टक्के बचत होऊ शकते. सध्याच्या बागायत क्षेत्रात दुपटीने वाढ शक्य आहे. शक्य तिथे बंद पाइपने पाणीपुरवठा योजना राबविणे हीच काळाची गरज आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात द्रवरूप खते देणे शक्य होते. परिणामी पिकांद्वारे उत्तम शोषण होऊन अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. पाण्यामध्येही ५० टक्के बचत शक्य होईल.

संरक्षित शेतीचा अवलंब करणे :
हवामानापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेडनेट किंवा हरितगृहांमध्ये लागवड उपयुक्त ठरू शकते. ढोबळी मिरची, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, टोमॅटो अशा पिकांची लागवड सध्या केली जाते. आर्थिकदृष्ट्या शक्य असलेल्या शेतकऱ्याने किमान १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी करण्याचा प्रयत्न करावा. त्यात ठिबकद्वारे पाणीपुरवठा, विद्राव्य खतांचा वापर योग्य व्यवस्थापन पद्धती या द्वारे उत्तम दर्जाचे व अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब :
लागवडीसाठी एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची आहे. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन मिळत असल्याने जोखीम कमी होते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (२:१), सोयाबीन + तूर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + फुलकोबी किंवा कोबी घेता येतील.

आच्छादनांचा वापर करणे :
कोरडवाहू क्षेत्रात ५ टन आच्छादनांचा वापर करून बाष्पीभवनाचा वेग रोखता येणे शक्य आहे. तसेच उन्हाळी हंगामात फळबागांमध्ये आच्छादन गरजेचे आहे.

प्रकाश परावर्तकांचा वापर :
केओलीन या प्रकाश परावर्तकाची ८ टक्के प्रमाणात फवारणी केल्यास पानांद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी करता येतो. फळपिकांसाठी पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत उपयोगी ठरते.

जलयुक्त शिवार व जलसंधारण ः गाव शिवारात माथा ते पायथा जलसंधारणाची कामे, साखळी बंधारे, शेततळे यातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे शक्य आहे. किमान दोन हंगामांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासोबत वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. सोबतच कोरडवाहू भागातील जनावरांच्या चाऱ्याचीही उपलब्धता होते.

संपर्क ः
सौ. दीपाली मुटकुळे - ९४२३२४६२१२
सौ. अमृता कदम - ७५८८१७५४५२

(सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

 


फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक...पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेपासून केवळ २० किमी...
बटाटा साठवणुकीच्या पद्धतीबटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य...
खत, पाणी नियोजनातून दर्जेदार खरबूज...माती परीक्षण अहवालानुसार खरबूज पिकात खत नियोजन...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात...
व्यवस्थापन दालचिनीचे...वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार...
वैशाखी मूग लागवडीसाठी सुधारित जातीबाजारातील मुगाची मागणी व दर पाहता खरिपासोबत...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
..अशी करा चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
उन्हाळी हंगामास सुरुवातमहाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीस उत्तर...
सकस, हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी फायदेशीरहिरव्या चाऱ्यासाठी बाजरी उन्हाळी व खरीप हंगामात...
भाजीपाला पिकाला द्या गरजेनूसार पाणी उन्हाळी हंगामात भेंडी, चवळी, गवार,...