सूक्ष्म फळांद्वारे बियांच्या प्रसाराची अनोखी पद्धत

बॅलेनोफोरा ही प्रकाश संश्लेषण न करणारी वनस्पती असून, तिला सर्वांत लहान आकाराची फळे येतात. या फळांचा व बियांचा प्रसार नेमका कशा प्रकारे होतो, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. जपान येथील कोबे विद्यापीठातील संशोधकांनी आजवर अज्ञात असलेली तिची बियांच्या प्रसाराची नावीन्यपूर्ण पद्धत शोधली आहे.
सूक्ष्म फळांद्वारे बियांच्या प्रसाराची अनोखी पद्धत
सूक्ष्म फळांद्वारे बियांच्या प्रसाराची अनोखी पद्धत

बॅलेनोफोरा ही प्रकाश संश्लेषण न करणारी वनस्पती असून, तिला सर्वांत लहान आकाराची फळे येतात. या फळांचा व बियांचा प्रसार नेमका कशा प्रकारे होतो, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. जपान येथील कोबे विद्यापीठातील संशोधकांनी आजवर अज्ञात असलेली तिची बियांच्या प्रसाराची नावीन्यपूर्ण पद्धत शोधली आहे. वनस्पतीमध्ये हिरवा रंग प्राधान्याने असून, या वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वयंपोषी असतात. प्रकाश संश्लेषण न करणाऱ्या अनेक वनस्पती निसर्ग अभ्यासकांना नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. बॅलेनोफोरा या गणातील वनस्पती या अन्य वनस्पतीच्या मुळांना चिकटून त्यातून आपले अन्न मिळवतात. बॅलेनोफोरो याकूशिमेन्सिस (Balanophora yakushimensis) ही वनस्पती काही अळिंबीसारखी असून, स्वतः प्रकाश संश्लेषण करत नाही. त्याला अत्यंत लहान आकाराची फळे येतात. या फळांतून फारसे पोषक घटक मिळत नसल्याने पक्षी अथवा प्राणी त्याकडे फारसे आकर्षित होत नाहीत. या वनस्पतीबाबत फारच कमी शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. कोबे विद्यापीठातील साहाय्यक प्रा. स्युतसुजू केन्जी यांनी या वनस्पतीच्या बियांच्या प्रसार नेमका कशा प्रकारे होतो, याविषयी अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासात वनस्पतींचे रसदार असे थोड्या मोठ्या आकाराचे काही भाग पक्ष्यांना आकर्षित करत असल्याचे दिसून आले आहे. त्याचा फायदा या वनस्पतींच्या बियांच्या प्रसारासाठी होत असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘इकॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. गुंतागुंतीची प्रसार प्रक्रिया ः अलीकडे झालेल्या अनेक अभ्यासातून अशा वनस्पतींच्या उत्क्रांती बदलातील अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया आढळल्या आहेत. उत्क्रांतीमध्ये अशा वनस्पतींची प्रकाश संश्लेषणाच्या क्षमतेचा ऱ्हास झाल्याचे जाणवते. त्याचा एक भाग म्हणून अत्यंत लहान आकार आणि बियांची गुंतागुंतीची रचना मिळवली. मात्र, बॅलेनोफोरा इनफ्रक्टन्सेस या अळिंबी सारख्या दिसणाऱ्या वनस्पतीमध्ये एकावेळा एक लाख ते दहा लाख सूक्ष्म फळे गोलाकार आकाराच्या रसदार ब्रॅक्टखाली येतात. त्यांच्या फळांच्या प्रसारासाठी उंदीरवर्गीय छोटे प्राणी महत्त्वाचे असल्याचे मानले जात होते. मात्र, प्रा. स्युतसुजू केन्जी यांनी याकुशिमा बेटांवर थंड जंगलामध्ये आढळणाऱ्या बॅलेनोफोरो याकूशिमेन्सिस या वनस्पतींचा अभ्यास केला. या वनस्पतीने फळांऐवजी रसदार ब्रॅक्टचा बियांच्या प्रसारासाठी वापर करून घेतला आहे. लाल रंगामुळे पक्षी त्याकडे आकर्षित होतात. ब्रॅक्ट त्यांच्याकडून खाल्ला गेला तरी फळे जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी पसरली जातात. त्यातून बियांचा सर्वत्र प्रसार होतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com