agriculture stories in Marathi 3G cutting method for vine vegetables | Agrowon

भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक उत्पादन शक्य

बी. बी. तांबोळकर, पी. बी. मांजरे, डॉ. डी. एल. चव्हाण
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे वाढवण्याच्या पद्धतीला ३ जी कटींग किंवा ३ जी शेंडा खुडणी पद्धत म्हणतात. या आधुनिक पद्धतीमुळे वेलवर्गीय व अन्य काही भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे.

वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे वाढवण्याच्या पद्धतीला ३ जी कटींग किंवा ३ जी शेंडा खुडणी पद्धत म्हणतात. या आधुनिक पद्धतीमुळे वेलवर्गीय व अन्य काही भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे.

झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकरण व वाढते शहरीकरण यामुळे दिवसेंदिवस लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे. शेतीसाठी उपलब्ध जागा कमी होत असून, कमीत कमी जागेमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धतींचा शोध सातत्याने सुरू आहे. ‘थ्रीजी कटिंग’ ही कृषी क्षेत्रातील आधुनिक पद्धत असून, त्याद्वारे वेलवर्गीय व अन्य काही भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढवणे शक्य आहे.

‘३ जी कटिंग’ म्हणजे काय?
थ्रीजी कटिंग म्हणजे तिसऱ्या पिढीतील शाखा होय. वेलांची किंवा रोपांची मुख्य शाखा म्हणजे पहिल्या पिढीतील शाखा, त्या शाखेचा शेंडा खुडून त्यावर आलेल्या शाखा ही दुसऱ्या पिढीच्या शाखा असते. या दुसऱ्या पिढीच्या शाखेवर आलेल्या शाखेला तिसरी पिढी किंवा थर्ड जनरेशन म्हणतात. अशा पद्धतीने कटिंग करून किंवा शेंडा खुडून रोपांना वाढवण्याच्या पद्धतीला ३जी कटिंग पद्धत असे म्हणतात.

तत्त्व :
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नर व मादी फुलांचे प्रमाण असमान असते. नर फुले जास्त तर मादी फुले कमी असतात. थ्रीजी कटिंग केल्यामुळे नर व मादी फुलांचे प्रमाण समान होते किंवा मादी फुलांचे प्रमाण वाढते.
मादी फुलांनाच फळधारणा होते. नर फुलांना फळधारणा होत नसली तरीही ते परागीभवनासाठी अतिशय महत्त्वाची असतात.

उद्देश :
नर आणि मादी फुलांचे योग्य प्रमाण राखून अधिक उत्पादन घेणे.
परिणामी प्रती वेल अधिक उत्पादन मिळवणे.

कोणत्या पिकात उपयुक्त ः
वेलवर्गीय भाजीपाला पिके उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा या सोबतच टोमॅटो, भेंडी, वांगी आणि मिरची इ. पिकांमध्ये ३ जी कटिंग पद्धत उपयुक्त ठरते.

पद्धत :

 • सर्वप्रथम पीक लागवड केल्यानंतर त्या पिकाची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यावी.
 • सुरुवातीच्या पाच ते सात पानांपर्यंत कोणतीही उपशाखा त्या झाडावर येऊ देऊ नये. उपशाखा आल्यास त्या ताबडतोब कापून किंवा खुडून टाकाव्यात. या आलेल्या उपशाखांवर नर फुलांचे प्रमाण अधिक असते.
 • पाच ते सात पानानंतर येणाऱ्या उपशाखा खुडू नयेत. त्या नैसर्गिकरित्या वाढू द्याव्यात.
 • झाड किंवा वेली पाच ते सात फूट उंचीच्या झाल्यावर त्याच्या मुख्य शाखेचा शेंडा खुडावा. त्यामुळे त्याची सरळ वाढ थांबून त्यावर उपशाखा येण्यास सुरुवात होते. आलेल्या उपशाखांवर १२ ते १५ पाने झाली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा. त्यावर पुन्हा उपशाखा येतील. या आलेल्या उपशाखांची पुन्हा वाढ करून घ्यावी.
 • या पद्धतीने मुख्य शाखा म्हणजे पहिली पिढी, उपशाखा म्हणजे दुसरी पिढी आणि शेवटी उपशाखांवर आलेल्या शाखा म्हणजे तिसऱ्या पिढीची शाखा होय. या क्रमाने रोपांची किंवा वेलींची वाढ करून घ्यावी.
 • आलेल्या तिसऱ्या पिढीच्या शाखांची वाढ चांगल्या रीतीने होऊ द्यावी. त्यावर मादी फुलांची उत्पत्ती होते. त्यामुळे फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होते.

घ्यावयाची काळजी :

 • थ्रीजी कटिंग करताना प्रत्येक १० ते १५ झाड किंवा वेलीनंतर थ्रीजी कटिंग न करता एक झाड किंवा वेल नैसर्गिकरित्या वाढू द्यावी. त्यामुळे त्यावर अधिक नर फुले येतील. ही फुले परागीभवनासाठी उपयुक्त ठरतील.
 • या वेलींवर अधिक फळधारणा होत असल्याने अन्नद्रव्याचे व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सामान्य पिकाच्या तुलनेत अधिक
 • उत्पादन मिळते. त्यामुळे पिकासाठी लागणरी अन्नद्रव्यांचे प्रमाणही जास्त असते.
 • मुख्य शाखावर दोन किंवा तीन उपशाखा वाढवून त्यावर १२ ते १५ पाने येऊ द्यावीत. त्यानंतर या उपशाखांचा शेंडा खुडून त्यावर परत दोन ते तीन शाखा वाढवाव्यात.
 • रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक योग्य नियोजन करावे.

फायदे -

 • वेलींवर मादी फुलांचे प्रमाण वाढल्याने अधिक फळधारणा होते.
 • योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास फळांची प्रत, आकार व त्याचबरोबर फळांचा दर्जा ही उंचावतो.
 • विशेष काळजी घेतल्यास अधिक कालावधीपर्यंत उत्पादन घेणे शक्य.
 • थ्रीजी कटिंग केल्यामुळे प्रती झाड किंवा कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळते. एकरी उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा वाढतो.

तोटे किंवा मर्यादा ः

 • पिकामध्ये थ्रीजी कटिंग हे पीक वाढीच्या योग्य अवस्थेमध्येच करावे लागते.
 • या पिकात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते.
 • फळधारणेसाठी सामान्य पिकाच्या तुलनेत अधिक विलंब होतो.

बी. बी. तांबोळकर, ९८२३८२८६४५
(साहाय्यक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, सौ.के.एस.के.काकू कृषी महाविद्यालय, बीड.)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...