राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन
आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा विचार करून आपल्या जमिनीत किती ओलावा आहे, तो किती काळ टिकू शकेल याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे. जमिनीची खोली व उपलब्ध ओलाव्यावर पीकपद्धतीचा अवलंब करावा.
आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा विचार करून आपल्या जमिनीत किती ओलावा आहे, तो किती काळ टिकू शकेल याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे. जमिनीची खोली व उपलब्ध ओलाव्यावर पीकपद्धतीचा अवलंब करावा.
उशिरा पेरणीसाठी अवर्षणाचा ताण सहन करणारे आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. बाजरी (धनशक्ती : ७४-७८ दिवस), तूर (फुले राजेश्वरी : १४५-१५० दिवस), सूर्यफूल (फुले भास्कर ः ८०-८४ दिवस), हुलगा (फुले सकस : ९०-९५ दिवस) या पिकांची निवड करावी.
१) उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. बाजरी + तूर (२:१) किंवा सूर्यफूल + तूर (२:१) आंतरपीक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो.
२) १५ जुलैनंतर सोयाबीन, मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा या पिकांची पेरणी करू नये.
३) पेरणी करताना योग्य वाणांची निवड, सुधारित व्यवस्थापन आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करावा.
४) उशिरा पेरणीसाठी मध्यम ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती निवडाव्यात. अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या जाती निवडाव्यात.
५) उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये २५ ते ४५ सें.मी. खोलीच्या जमिनीवर आंतरपीक घेण्याची शिफारस केली आहे. बाजरी + तूर (२:१) आंतरपीक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो.
६) बाजरी आणि सूर्यफूल ही पिके ९० ते १०० दिवसांत तयार होतात, तर तूर पिकाचा कालवधी १४५ ते १५० दिवसांचा असल्यामुळे पिकाच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागवली जाते. पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पीक तरी निश्चितच पदरात पडते. अवर्षण परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत होते. तूर + गवार (१:२), एरंडी + गवार (१:२), सूर्यफूल + तूर (२:१) घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच अधिक फायदा होतो.
पावसाच्या आगमनानुसार करावयाचे पीक नियोजन
पावसाचा कालावधी - पिकांची निवड - आंतरपिके
१५ ते ३१ जुलै दरम्यान पाऊस पडल्यास -
बाजरी, तूर, सूर्यफूल, हुलगा, एरंडी -
सूर्यफूल + तूर (२:१)
बाजरी + तूर (२:१)
गवार + तूर (२:१)
टीप ः मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा या पिकांची लागवड करू नये.
संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
- 1 of 579
- ››