agriculture stories in Marathi Agribots are future | Agrowon

आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानव

डॉ. गोपाळ शिंदे, तनजीम खान
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

कोणत्याही क्षेत्रात आधुनिकीकरण आवश्यक असते. शेतीमध्येही रोबोटिक्स, मशिन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. यातून कृषी क्षेत्राचा चेहरा बदलला जाणार आहे.

जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेमध्ये भारत अद्याप प्रचंड मागे आहे. अलीकडे शेतीमध्ये कष्टाच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्धता कमी होत चालली आहे. सामान्यपणे एकच काम दिवसभर करण्यामध्ये ताकद, कुशलता यांचा वापर होत असला, तरी माणसाला बुद्धिमत्तेचा वापर करावा लागत नाही. त्यात त्याच्या मेंदूला नवे काही करण्याचे किंवा सृजनशीलतेचे आव्हान असत नाही. परिणामी, अशा कामांना माणूस लवकर कंटाळतो. त्यातून चुका होण्याचा संभव असतो. विशेषतः यंत्राच्या बरोबर काम करताना दुर्लक्ष होण्यातून अपघात होण्याची शक्यता वाढते. अशा दैनंदिन, त्याच त्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रमानव उपयोगी ठरतात. त्याला इंग्रजीमध्ये ‘ॲग्रीबोट’ असेही म्हणतात. परदेशामध्ये दरडोई क्षेत्र अधिक असल्याने विविध मोठ्या आकारांच्या यंत्रांसोबतच यंत्रमानवांचा वापरही वाढत आहे.

आपल्याला यंत्रमानव असे म्हटले, की दरवेळी मानवाच्या आकारातील यंत्र डोळ्यासमोर येते. मात्र हे ॲग्रीबोट कामाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध आहेत. शेतीमध्ये विविध कामांच्या अनुषंगाने त्यांची निर्मिती केली जाते. ही यंत्रे पिकांमध्ये छाटणी, फवारणी, तणनियंत्रण, कापणी किंवा वेचणी अशा कामांसाठी वापरता येतात. अशी यंत्रे केवळ एका कामांसाठी किंवा अनेक कामांसाठी तयार केलेली असतात. बहुतेक ॲग्रीबोट हे जीपीएस (उपग्रहाद्वारे दिशादर्शन व समन्वय करणारी प्रणाली) तंत्रज्ञानाने स्वयंचलित ठरवलेली कार्ये करू शकतात. त्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये योग्य त्या सूचना भरलेल्या असतात. त्यात शेतकरी काही गरजेनुसार बदल करू शकतो. किंवा काही रोबोटमधील जीपीएसद्वारे शेतकरी स्वत: काही सूचना किंवा मार्गदर्शन करून चालवू शकतो. अशा यंत्रामध्ये विविध प्रकारचे सेन्सर वापरले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे हे कृत्रिम दृष्टीसारखे काम करतात. त्याच प्रमाणात काही निर्णय त्या त्या वेळच्या गरजेनुसार घेण्यासाठी यंत्रमानवामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) दिलेली असते.

उपयुक्तता ः
१) आधुनिक यंत्रमानवामुळे कामांचा वेग प्रचंड वाढतो.
२) धोकादायक स्थितीतही काम करणे शक्य.
३) कडाक्याच्या उन्हापासून ते गोठवणक्षम तापमानातही काम करण्याची क्षमता.
४) पुनरावृत्ती असलेली कार्ये न कंटाळता करण्याची क्षमता.
५) ठरलेल्या अचूकतेने कार्य शक्य.

महत्त्व व फायदे -

  • आज भारतातील शेती ही संपूर्णपणे मानवी आणि पशुबळांच्या कष्टाने केली जाते. त्यांच्या जीवशास्त्रीय मर्यादा आहेत. त्या तुलनेमध्ये यंत्रमानव (ॲग्रीबोट) हे वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध होऊ शकतात. गरजेनुसार अगदी कीटकांच्या, पक्ष्यांच्या, माणसांच्या आकाराचेही यंत्रमानव विविध उद्योगांमध्ये वापरले जातात. आवश्यकतेनुसार त्यांचा वापर शेतकरी करू शकतात.
  •  प्रारंभिक किमती जास्त असल्या तरी भविष्यात जसजसा त्यांचा वापर वाढत जाईल, तसे ते कमी किमतीतही उपलब्ध होत जातील.
  •  यामध्ये विविध गोष्टींसाठी सेन्सर असल्यामुळे यंत्र खराब होण्याची शक्यता कमी असते. परिणामी, देखभाल, दुरुस्तीवरील खर्च अत्यंत कमी राहू शकतो.

शेतीत उपयुक्तता
कापणीसाठी व कलमासाठी.
मशागतीसाठी. (लेव्हलिंगपासून नांगरणीपर्यंतची सर्व कामे.)
फवारणी.
स्वयंचलित पेरणी.
पिकांची काढणी किंवा वेचणी.
पिकांना सिंचन, खते देणे.

यंत्रमानवाचे घटक ः

१) सेन्सर ः हे साधन वेगवेगळ्या दुव्यांना (उदा. आवाज, दाब, प्रकाश, हालचाल इ.) योग्य ते प्रतिसाद देते. उदा. प्रॉक्झिमिटी सेन्सर, टच सेन्सर, सॉईल मॉइश्‍चर सेन्सर, एअर फ्लो सेन्सर, टेंपरेचर सेन्सर, ऑप्टिकल सेन्सर, इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर, माइक्रोफोन्स, कॅमेरा, कार्यवाहक
२) प्रत्यक्ष कामांसाठी, स्थिरतेसाठी आवश्यक ते यांत्रिकी घटक ः यात यंत्रमानवाची जोडणी कामाच्या स्वरूपानुसार योग्य ते रूप दिले जाते. उदा. एन्ड इफेक्टर, ग्रीप्ट मॅन्युप्युलेटर, नट बोल्ट, रोबोट चॅसिस, पंप, क्लॅम्प, बॉडी किंवा फ्रेम, ड्राइव्ह ट्रेन इ.
३) कामे करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा पुरवणारे घटक ः विद्युत ऊर्जेची उपलब्धता करणारी उपकरणे, किंवा वाहून तिथपर्यंत नेणारी उपकरणे. उदा. स्विचेस, डीसी मोटार, इलेक्ट्रॉनिक कीट, वीजपुरवठा इ.

तनजीम खान, ८०८७२२२८४८‍
(कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी, नाहेप-कास्ट, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर टेक्नोवन
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...