agriculture stories in Marathi, Agromoney, moringa powder making | Agrowon

शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय फायदेशीर 
विनोद इंगोले
सोमवार, 15 जुलै 2019

संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा निर्णय घेत शंतनू चंद्रशेखर महल्ले यांने धाडसी पाऊल उचलले आहे. केवळ शेंगा विक्रीवरच न थांबता शेवगा पानापासून पावडरनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कंपनी स्थापन केली असून, आकर्षक पॅकिंगसह निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा निर्णय घेत शंतनू चंद्रशेखर महल्ले यांने धाडसी पाऊल उचलले आहे. केवळ शेंगा विक्रीवरच न थांबता शेवगा पानापासून पावडरनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कंपनी स्थापन केली असून, आकर्षक पॅकिंगसह निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

मूळचे रामगाव येथील रहिवासी असलेल्या महल्ले कुटुंबीयांची लोही (जि. यवतमाळ) शिवारात २० एकर शेती आहे. गेल्या १० वर्षांपासून महल्ले कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर आदी पिके घेत. मात्र, त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत नव्हते. पॉलीटेक्निक पदविका पूर्ण केल्यानंतर शंतनू चंद्रशेखर महल्ले याने शेतीमध्ये लक्ष घातले. यावर मार्ग काढण्यासाठी शंतनूने इंटरनेटवर विविध पिकांचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. त्यातून शेवगा पिकाविषयी माहिती मिळाली. कमी पाण्यामध्ये वाढीसह औषधी गुणधर्मांसाठी उपयुक्त असलेल्या शेवग्याची संपूर्ण वीस एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सप्टेंबर २०१८ मध्ये १२ फूट बाय ५ फूट अंतरावर १०,५०० रोपांची लागवड केली. प्रतिरोप १३ रुपये खर्च आला. 

  • ठिबक सिंचन यंत्रणेसाठी ४ लाख रुपये खर्च आला. 
  • शेतपरिसरामध्ये रानडुकरांमुळे मोठे नुकसान होत होते. हाती आलेले पीक वाया जाई. ते टाळण्यासाठी संपूर्ण २० एकर क्षेत्राला पाच तारांचे कुंपण केले. यासाठी सहा लाख रुपये खर्च आला. 
  • सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी गांडूळखतांची निर्मिती सुरू केली. त्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला. 
  • लागवड व अन्य मजुरी साधारणपणे एक लाख रुपये लागले. 
  • सहा महिन्यांमध्ये शेंगाचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या टप्प्यात १० क्विंटल उत्पादन मिळाले असून, त्याची विक्री २५ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे झाली आहे. 

हा खर्च असा वसूल होईल 

  • पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर प्रतिझाडापासून सहा किलोपर्यंत शेंगा उत्पादन मिळू शकते. 
  • १०५०० गुणिले ६ या प्रमाणे त्याला ६३ हजार किलो उत्पादन मिळेल. त्याला २० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे १२.६ लाख रुपये उत्पन्न प्रतिवर्ष अपेक्षित आहे. 
  • एकरी ७ ते १० हजाराप्रमाणे २० एकरासाठी १.४ ते २.० लाख रुपये खर्च येईल. 

शेवगा पानांची पावडरनिर्मिती 
शेवगा शेंगाइतकीच त्याची पानेही पोषक घटकांनी परिपूर्ण असल्याने जागतिकस्तरावर चांगली मागणी असल्याचे शंतनूला समजले. शेवगा पानांची पावडरनिर्मिती आणि विक्री या व्यवसायात उतरण्याचा निर्णय शंतनू याने घेतला. त्याने आई रोहिणी यांच्यासह ओनली मी सुपर फुडस या नावाने प्रोप्रायटरी फर्म स्थापन केली. त्याची कंपनी ॲक्टअंतर्गत नोंदणी केली असून, रोहिणी महल्ले या व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

पावडरनिर्मिती व विक्री ः 

  • शेवग्याची पाने तोडून ती सध्या नैसर्गिकरीत्या वाळवली जातात. उन्हाळ्यामध्ये सरासरी दोन दिवसांमध्ये, तर पावसाळा, हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांपर्यंत पाने वाळतात. त्याची घरातील मिक्सरमध्येच भुकटी तयार केली जाते. 
  • १०० ग्रॅम आकाराच्या बाटल्यामध्ये पॅकिंग व विक्री कली जाते. त्याचा ओन्ली मी सुपर फूड्स असा ब्रॅण्ड तयार करण्याचा मानस आहे. 
  • शेवगा पानातील प्रथिने आणि अन्य पोषक घटकांविषयी भारतीय ग्राहकांमध्ये फारशी जागृती नाही. त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी सध्या परिसरातील विविध डॉक्टरांची भेट घेऊन, त्यांना या पोषक पूरक घटकांविषयी माहिती देत आहे. त्यांच्या शिफारशीतून मेडीकल दुकानातून उत्पादनांची उपलब्धता करत आहेत. हळूहळू ग्राहकांची प्रतिसाद वाढत आहे. 
  • मे महिन्यामध्ये शंतनूने महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाच्या वतीने फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण घेतले. त्यातून निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

शंतनु महल्ले, ९१७५३२२०१० 

इतर अॅग्रोमनी
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...
मंदीतून सावरण्यासाठी उद्योग क्षेत्राला...पणजी : देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला...
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
शेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कलचीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही....
कृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक...ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत...
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य...
सोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स...सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी...
देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढमुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस...
घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये...सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...