agriculture stories in marathi agrovision Greening devastates the citrus industry: New research offers a solution | Agrowon

लिंबूवर्गीय बागेतील ‘सिट्रस ग्रिनिंग’चे निदान होणार त्वरित 
वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

लिंबूवर्गीय फळबागेमध्ये येणाऱ्या सिट्रस ग्रिनिंग रोगांचे निदान लवकर करण्यासाठी एक नावीन्यपूर्ण धोरण फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्यामुळे रोगवाहकांकडून प्रसाराला सुरवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्ये निदान करणे शक्य होणार आहे. 

लिंबूवर्गीय फळबागेमध्ये येणाऱ्या सिट्रस ग्रिनिंग रोगांचे निदान लवकर करण्यासाठी एक नावीन्यपूर्ण धोरण फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्यामुळे रोगवाहकांकडून प्रसाराला सुरवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्ये निदान करणे शक्य होणार आहे. 

सिट्रस हुआंतलाँबींग (HLB) याला ग्रिनिंग या नावानेही ओळखले जाते. लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये येणाऱ्या सर्वात हानिकारक अशा रोगामुळे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगामुळे फळे तुरट राहण्यासोबत हिरवी राहतात. परिणामी, बाजारामध्ये त्याला चांगली किंमत मिळत नाही. एकदा झाडाला रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही उपाय काम करत नसल्याने काही वर्षांतच झाड मृत होते. या ग्रिनिंग रोगांमुळे फ्लोरीडा येथील लिंबूवर्गीय फळ उद्योग नष्ट झाला असून, कॅलिफोर्निया आणि टेक्सास येथील फळबागांना धोका उत्पन्न झाला आहे. असाच धोका ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांमध्येही दिसून येत आहे. 

सध्या एचएलबी रोगकारक घटक कॅन्डाडॅटस लिबेरीबॅक्टर अॅसियटीकसचा प्रसार रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यात स्वच्छतेचे उपाय, रोगांचा प्रसार करणाऱ्या एशियन सिट्रस सायला या किडीचे नियंत्रण, रोगग्रस्त झाडे काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे, नवीन लागवड रोगमुक्त रोपांची करणे अशा उपाययोजनांचा समावेश होतो. दुसऱ्या बाजूला ग्रिनिंग ग्रस्त झाडांचे लवकरात लवकर निदान करणे सर्वात महत्त्वाचे ठरते. पारंपरिक निदान पद्धती ही प्रामुख्याने लक्षणांवर अवलंबून असून, मूलद्रव्यीय साधनांद्वारे निश्चिती करण्यात येते. अनेकवेळा झाडांवर बाह्यस्वरूपात लक्षणे रोगाचा प्रसार झाल्यानंतरही काही महिन्यांपर्यंत दिसून येत नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये रोगांचा सर्व बागेमध्ये प्रसार झालेला असतो. 

  • फ्लोरिडा विद्यापीठातील कृषी शास्त्र विभागातील लिंबूवर्गीय फळ संशोधन आणि शिक्षण केंद्रातील प्रो. नियान वांग आणि त्यांचे पोस्टडॉक्टारल संशोधन सहाय्यक डॉ. शेओ शंकर पांडे यांनी ग्रिनिंग रोगांचे लवकर निदान करण्यासाठी एक धोरण विकसित केले आहे. त्यामुळे फळांवर लक्षणे दिसण्यापूर्वी निदान करणे शक्य होईल. त्यासाठी त्यांनी अत्यंत कमी किमतीच्या चाळणी पद्धतीचा वापर केला आहे. त्यातून कीटकांच्या खाद्य ठिकाणांची ओळख पटून, त्यानुसार रिअल टाईम पीसीआर तंत्राने संख्यात्मक अनुमान मिळवणे शक्य होणार आहे. 
  • या पद्धतीमुळे रोगकारक घटकांची ओळख व रोगाचा प्रसार झाल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्ये होऊ शकेल. हे निदान लक्षणे दिसण्याच्या कितीतरी आधी असणार आहे. परिणामी, रोगांचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. हे तंत्रज्ञान कॅलिफोर्निया, टेक्सास, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले. 
  • हे संशोधन फायटोपॅथॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

इतर बातम्या
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...