agriculture stories in marathi, agrovision, How bees live with bacteria | Agrowon

एकल माश्या, जिवाणू यातील संबंधांचा अभ्यास आवश्यक
वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

माश्यांच्या एकूण प्रजातीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रजाती या वसाहती न करणाऱ्या आहेत. या प्रजाती जगण्याचा संघर्ष एकट्यानेच पार पाडत असून मधमाश्यांसारख्या, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये धोक्यात आहेत. अशा कीटकाच्या परिस्थितीकीचा अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता संशोधक व्यक्त करत आहेत. 

माश्यांच्या एकूण प्रजातीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रजाती या वसाहती न करणाऱ्या आहेत. या प्रजाती जगण्याचा संघर्ष एकट्यानेच पार पाडत असून मधमाश्यांसारख्या, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये धोक्यात आहेत. अशा कीटकाच्या परिस्थितीकीचा अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता संशोधक व्यक्त करत आहेत. 
वसंतामध्ये सफरचंदाची झाडे पूर्ण फुलोऱ्यामध्ये असतात. या फुलोऱ्याचे रुपांतर शरद ऋतूमध्ये फळांमध्ये होत असते. फुलोऱ्याच्या काळामध्ये माश्यांच्या कामावरून ते फूल फळ होण्यात यशस्वी होणार की नाही, हे ठरत असे. सध्या माश्यांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. भविष्यामध्ये प्रत्येक फुलाचे ब्रशच्या साह्याने परागीकरण करण्याचे हेच काम माणसांना करावे लागेल. सध्या चीनच्या काही प्रदेशांमध्ये ही बाब सत्यात उतरली आहे. 
माश्यांची संख्या कमी होण्यामागील नेमक्या कारणांविषयी अद्याप माणसाला समजू शकलेले नाही. कृषी क्षेत्रातील कीटकनाशकांचा वापर, रहिवासाची हानी, रोगकारक सूक्ष्मजीव अशा अनेक संभाव्य कारणांचा सध्या अभ्यास केला जात आहे. जर्मनी येथील ज्युलियन मॅक्सिमिलन्स युनिव्हर्सिटाट बुर्झबर्ग येथील संशोधकांचा एक गट माश्यांसोबत आणि माश्यांच्या शरीरात राहणाऱ्या जिवाणू यावर संशोधन करत आहे. कारण हे सूक्ष्मजीव एखाद्या जीवांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. 

माश्या आणि जिवाणू यातील संबंधाचे स्तर 

  • आपणा सर्वांना ज्ञात अशा मधमाश्यांच्या पचनसंस्थेमधील जिवाणू हे त्यांना अन्न पचवण्यामध्ये मदत करतात. त्याच प्रमाणे त्यांची प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही मदत करतात. मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये असलेल्या उपयुक्त सूक्ष्मजीवाणूंपैकी काही जिवाणू प्रतिजैविकांची निर्मिती करतात. त्यामुळे वसाहतामध्ये हानिकारक बुरशींची वाढ होत नाही. त्याविषयी माहिती देताना डॉ. अॅलेक्झांडर केलर यांनी सांगितले, की आजवर बहुतांश संशोधन सामाजिक माश्यांच्या संदर्भात झालेले आहे. त्यातही पाश्चिमात्य मधमाधी एपिस मेलिफेरा या जातींसंदर्भात अधिक संशोधन झाले आहे. एकल राहणाऱ्या माश्यांकडे (त्यांना इंग्रजीमध्ये सॉलिटरी बी म्हणून ओळखले जाते.) फारच कमी लक्ष दिले आहे. एकूण माश्यांच्या प्रजाती सुमारे १७,५०० असून, त्यातील सुमारे ९० टक्के माश्या एकल प्रकारच्या आहेत. या सर्व माश्या चांगल्या परागवाहक असून, पर्यावरणदृष्ट्या आणि कृषी उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 
  •  मधमाश्या यांचा अभ्यास अत्यंत मर्यादित पातळीवर प्रारुप म्हणून उपयुक्त ठरू शकतो. केलर यांच्या मते, एकल माश्या आणि सूक्ष्मजीवांच्या संदर्भातील अधिक अभ्यासाची आवश्यकता असून, त्यातूनच 
  • कदाचित माश्यांच्या मृत्यूंच्या नेमक्या कारणांचा वेध घेता येईल. अनेक माशी प्रजातींचे आधीच उच्चाटन झाले असून, काही धोक्यामध्ये 
  • आहेत.   
  •  आजवर मधमाश्यांचा अभ्यास हा एकल माश्यांसाठीही उपयुक्त ठरू शकेल, अशा अंदाजाने सर्व संशोधन होत आले आहे. पण अगदीच मूलभूत साम्य वगळता बहुतांश जगण्याच्या पद्धती दोन्हीमध्ये वेगळ्या आहेत. या निष्कर्षापर्यंत संशोधक पोचले आहे. त्याचे निष्कर्ष ‘ट्रेंड्स इन मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

विविध घटकांचे परिणाम 

  •  एकल माश्यांवर पर्यावरणातील घटकांचे व माणसांमुळे पर्यावरणात घडणाऱ्या बदलांचे तीव्र परिणाम होतात. या तीव्रतेचे परिणाम सामाजिक माश्यांच्या तुलनेमध्ये अधिक असतात. 
  •  सूक्ष्मजीवांशी असलेल्या संबंधाबाबतही त्यामध्ये मोठी भिन्नता आढळते. 
  •  हवामानातील बदल, कृषी पद्धतीतील बदल, रहिवासांचा ऱ्हास अशा अनेक घटकांचा विचार होत असला तरी त्यांचे नेमके संबंध आपल्याला माहित नाहीत. 

इतर ताज्या घडामोडी
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...