agriculture stories in Marathi, agrovision, IIHR develops २ processable tomato hybrids | Agrowon

अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक दोन संकरित टोमॅटो जाती विकसित

वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या दोन संकरित टोमॅटो जाती बेंगळुरू येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने विकसित केल्या आहेत. या जातींचे हेक्टरी उत्पादन ५० टनांपर्यंत मिळणार असून, शेतकऱ्यांना किमान २५ टक्के उत्पादनवाढ अपेक्षित आहे. त्यांचे नाव अर्का विशेष (एच-३०९) आणि अर्का अपेक्षा (एच -३८५) असे आहे. या जाती रोगांसाठी प्रतिकारक असून, यामध्ये एकूण विद्राव्य घनपदार्थ (टोटल सोल्युबल सॉलिड्स) आणि लायकोपेनचे प्रमाण अधिक असल्याने प्रक्रियेच्या खर्चात बचत होणार आहे.

प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या दोन संकरित टोमॅटो जाती बेंगळुरू येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने विकसित केल्या आहेत. या जातींचे हेक्टरी उत्पादन ५० टनांपर्यंत मिळणार असून, शेतकऱ्यांना किमान २५ टक्के उत्पादनवाढ अपेक्षित आहे. त्यांचे नाव अर्का विशेष (एच-३०९) आणि अर्का अपेक्षा (एच -३८५) असे आहे. या जाती रोगांसाठी प्रतिकारक असून, यामध्ये एकूण विद्राव्य घनपदार्थ (टोटल सोल्युबल सॉलिड्स) आणि लायकोपेनचे प्रमाण अधिक असल्याने प्रक्रियेच्या खर्चात बचत होणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून संकरित टोमॅटो जातींच्या विकासासाठी संस्थेमध्ये संशोधन सुरू आहे. या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख ए. टी. सदाशिवा यांनी सांगितले, की भारतामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी टोमॅटो जाती खास विकसित केल्या आहेत. या जाती टोमॅटोतील रोगांसाठी प्रतिकारक असून, उत्पादन ५० टन प्रति हेक्टर देतात. ठिबक सिंचनासह अत्यंत काटेकोर व्यवस्थापन केल्यास त्याचे उत्पादन हेक्टरी १०० पर्यंतही जाऊ शकेल. सध्याच्या संकरित जाती ४० टन प्रति हेक्टर सरासरी उत्पादन देत असताना शेतकऱ्यांना नव्या जातींमुळे किमान २५ टक्के वाढ मिळू शकते. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चामध्ये घट होणार आहे.

  • या जाती टोमॅटोमध्ये नुकसानकारक ठरणाऱ्या विषाणूजन्य रोग (लीफ कर्ल व्हायरस), जिवाणूजन्य कुज, लवकर येणारा करपा या रोगांना प्रतिकारक आहेत. परिणामी पिकाच्या संरक्षणासाठी होणाऱ्या फवारण्याची संख्या कमी होते.
  • नव्या टोमॅटो जातीमध्ये एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण १० टक्के अधिक आहे. यामुळे प्रक्रिया उद्योगातील प्रक्रियेसाठीच्या ऊर्जेमध्ये बचत होते.
  • टोमॅटोमध्ये चांगला रंग येण्यासाठी कारणीभूत लायकोपेनचे प्रमाण २५ ते ३० टक्के अधिक आहे.

अन्य फायदे ः
सध्याच्या उपलब्ध टोमॅटो जातींपासून संकराद्वारे विकसित केलेल्या जाती यांत्रिक काढणीसाठी योग्य आहेत. या जाती व्यावसायिक लागवडीसाठी डिसेंबरमध्ये प्रसारीत करणार असल्याची माहिती संस्थेतील काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख एच. एस. ओबेरॉय यांनी दिली.

प्रक्रियेसाठी टोमॅटो...

सध्या २०१८-१९ मधील भारतातील टोमॅटोचे उत्पादन १९.३९ दशलक्ष असून, ते २०१७-१८ च्या (१९.७५९ दशलक्ष टन) तुलनेमध्ये कमी आहे. भारतामध्ये उत्पादित होत असलेल्या टोमॅटोच्या ९० टोमॅटो हे ताज्या स्वरूपात वापरले जातात.
सध्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नव्या जातींची चाचणीसाठी लागवड केली आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या कंपन्यांशी संस्था बोलणी करत आहेत.
बहुतांश टोमॅटो प्रक्रिया उद्योजक हंगामामध्ये जानेवारी ते मार्च काळात टोमॅटोचे उत्पादन उच्च पातळीवर आणि किंमती कमी असताना टोमॅटोची खरेदी करतात. या टोमॅटोपासून गर काढून तो पुढील केचप आणि सॉस निर्मिती प्रक्रियेसाठी साठवून ठेवला जातो. सुमारे सात किलो टोमॅटोपासून एक किलो गर मिळतो. टोमॅटो उद्योगातील स्रोताने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये सुमारे १.२ लाख टन टोमॅटो गराची आवश्यकता असून, त्यातील केवळ ७० हजार टन टोमॅटो गर भारतातून उपलब्ध होतो. उर्वरित टोमॅटो गर हा चीनमधून आयात केला जातो.


इतर अॅग्रो विशेष
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...