agriculture stories in marathi agrovision Potential for reduced methane from cows | Agrowon

पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे शक्य 

वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे शक्य असल्याचे मत अॅडलेड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांशी जुळवून घेण्याची गायीची वैयक्तिक जनुकीय क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे शक्य असल्याचे मत अॅडलेड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांशी जुळवून घेण्याची गायीची वैयक्तिक जनुकीय क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

गायी आणि अन्य रवंथ करणाऱ्या प्राण्यांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण लक्षणीय आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाच्या सुमारे ३७ टक्के हे प्रमाण आहे. एक गाय सरासरी ७० ते १२० किलो मिथेन प्रतिवर्ष तयार करते. जागतिक पातळीवर गायींची संख्या समारे १.५ अब्ज आहे. 
यासाठी अॅबरडिन विद्यापीठातील रोवेट्ट संस्थेच्या नेतृत्वाखाली रुमिनोमिक्स हा प्रकल्प राबवण्यात येत असून, त्यामध्ये पार्को टेक्नॉलॉजिको पॅदानो (इटाली), बेन गुरीयन विद्यापीठ (नेगाव्ह, इस्राईल) यासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक संस्थांचा समावेश आहे. त्याविषयी माहिती देताना अॅडलेड विद्यापीठातील प्राणीशास्त्र आणि पशुवैद्यकशास्त्र विद्यालयातील प्रो. जॉन विल्यम्स यांनी सांगितले, की गायींच्या पचनसंस्थेतील मिथेननिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा पातळी आणि प्रकार यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे हे त्यांच्या जनुकीय कार्यक्षमतेवर अवलंबून असते. याचाच एक अर्थ आपण अशा गायींची निवड करू शकतो, की ज्या अत्यंत कमी प्रमाणात मिथेननिर्मित्या सूक्ष्मजीवांना थारा देतील. 

  • संशोधकांनी एक हजार दुधाळ गायींच्या पचनसंस्थेतील द्रवातील सूक्ष्मजीवांच्या समुदायाचे विश्लेषण केले. त्यासोबत प्रत्येक गायीची आहार, दूध उत्पादन, मिथेन उत्पादन आणि अन्य जैवरासायनिक गुणधर्मांच्या नोंदी ठेवण्यात आल्या. 
  • याआधी झालेल्या अभ्यासामध्ये आहारातील बदलाद्वारे मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे दिसून आले होते. मात्र, गायींमध्ये जनुकीय बदल घडवणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे कायमस्वरूपी मिथेन उत्सर्जनावर उपाय मिळू शकेल, असे मत प्रो. विल्यम्स यांनी व्यक्त केले. अर्थात, या गुणधर्माबरोबर दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोगप्रतिकारकता याबाबतचे प्राधान्य ठरवावे लागतील. 
  • गायीच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव आणि दूध उत्पादनाची कार्यक्षमता यामध्ये काही प्रमाणात संबंध असला तरी अधिक अभ्यास करावा लागणार आहे. 
टॅग्स

इतर बातम्या
जेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न? मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...