agriculture stories in marathi, agrovision, Scientists propose environmentally friendly control practices for harmful tomato disease  | Agrowon

टोमॅटोवरील विषाणुजन्य रोगांसाठी शोधले पर्यावरणपूरक पर्याय 
वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

स्पॅनिश शास्त्रीय संशोधन परिषदेच्या संशोधकांनी टोमॅटोवरील अत्यंत नुकसानकारक ठरणाऱ्या पिवळा लीफ कर्ल या रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन पर्यावरणपूरक उपाय शोधले आहेत. अतिनील किरणे रोधक प्लॅस्टिकखाली टोमॅटोची लागवड आणि सॅलिसिलिक आम्लाचा नियंत्रणासाठी वापर फायदेशीर ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

स्पॅनिश शास्त्रीय संशोधन परिषदेच्या संशोधकांनी टोमॅटोवरील अत्यंत नुकसानकारक ठरणाऱ्या पिवळा लीफ कर्ल या रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन पर्यावरणपूरक उपाय शोधले आहेत. अतिनील किरणे रोधक प्लॅस्टिकखाली टोमॅटोची लागवड आणि सॅलिसिलिक आम्लाचा नियंत्रणासाठी वापर फायदेशीर ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

टोमॅटोवरील पिवळा लीफ कर्ल हा सर्वांत नुकसानकारक रोग आहे. जगभरातील टोमॅटो उत्पादकांसह अर्थव्यवस्थेसाठीही धोकादायक ठरू शकतो. या रोगाचा सामना करण्यासाठी कीडनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उपाययोजनांचे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या रोगासाठी प्रतिकारक अशा संकरित जातीचा वापर काही शेतकरी करत असले तरी, मूळ टोमॅटोची चव मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार होत होती. पर्यायाने मागणीवर परिणाम होतो, असे अनेकांचे मत होते. अशा समस्यांवर मात करण्याबरोबरच पर्यावरणपूरक ठरणाऱ्या उपायांचा शोध जगभरातील शास्त्रज्ञ घेत आहेत. स्पॅनिश कॉन्सिल ऑफ सायन्टिफिक रिसर्च येथील संशोधकांनी अशाच विषाणूजन्य रोगांवर मात करण्यासाठी दोन पर्यायी पद्धतीचा शोध लावला आहे. त्याच्या चाचण्या हरितगृह आणि बाह्य शेतामध्ये सलग तीन वर्षे घेण्यात आल्या असून, त्याचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. 
१. अतिनील किरणे रोखणाऱ्या प्लॅस्टिक खाली लावण्यात आलेल्या टोमॅटो रोपांमध्ये पिवळ्या लीफ कर्ल रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. 
२. टोमॅटो रोपांची संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सॅलिसिलिक आम्लाचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले. 

अधिक चांगले निष्कर्ष मिळण्यासाठी संशोधकांनी दोन्ही उपाययोजना एकत्रित वापरण्याचे सुचवले आहे. या दोन्ही पद्धती विषाणुजन्य रोगांपासून संरक्षित आणि बाह्य शेतावरील व्यावसायिक टोमॅटो पिकांचा बचाव करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. हे निष्कर्ष प्लॅंट डिसीज या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...