दुर्मीळ जिवाणूमुळे उलगडली प्रकाश संश्लेषणाची उत्क्रांती प्रक्रिया 

दुर्मीळ जिवाणूमुळे उलगडली प्रकाश संश्लेषणाची उत्क्रांती प्रक्रिया 
दुर्मीळ जिवाणूमुळे उलगडली प्रकाश संश्लेषणाची उत्क्रांती प्रक्रिया 

लंडन येथील इंपीरिअल कॉलेजमधील संशोधकांना दुर्मीळ जिवाणूमध्ये वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेशी मिळतीजुळती संरचना आढळून आली आहे. ही प्रक्रिया आपल्याला ज्ञात असलेल्या काळाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचा हा पुरावा मानला जात आहे. यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या उत्क्रांतीचा पुनर्विचार करावा लागणार आहे.  सौरऊर्जेचे रूपांतर शर्करेमध्ये करण्याच्या क्षमतेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती, शेवाळ आणि काही जिवाणूंमध्ये ऑक्सिजेनिक प्रकाश संश्लेषणाची क्षमता असल्याचे दिसून आले. या प्रक्रियेमध्ये पाण्याचे रूपांतर ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये केले जाते. यातील हायड्रोजनचा वापर प्रक्रियेतील ऊर्जा म्हणून होतो, तर ऑक्सिजन हे बाहेर टाकावयाचा घटक असतो. काही जिवाणूही ऑक्सिजेनिक प्रकाश संश्लेषण करतात. मात्र, त्यामध्ये पाण्याऐजी अन्य मूलद्रव्यांचा वापर करतात. त्यांच्या शारीरिक प्रक्रियेतून ऑक्सिजनची निर्मिती होत नाही.  संशोधकांच्या गृहीतकानुसार, ऑक्सिजनविरहित प्रकाश संश्लेषण हे अधिक प्राथमिक प्रक्रिया असून, त्याचा काळ हा सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी आहे. त्यातून ऑक्सिजेनिक प्रक्रिया सुमारे १ अब्ज वर्षांनंतर विकसित झाल्याचे मानले जाते.  प्राचीन काळातील जिवाणूंच्या अंतर्गत संरचनेचे विश्लेषण केले असता इंपीरिअल कॉलेज लंडन येथील संशोधकांना ऑक्जिनेनिक प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही आपल्या अपेक्षेपेक्षा १ अब्ज वर्षे आधी शक्य असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘जर्नल ट्रेन्ड्स इन प्लॅंट सायन्स’मध्ये प्रकाशित केले आहे.  संशोधन आणि निष्कर्ष ः 

  • डॉ. तनाई कार्डोना यांनी सांगितले, की आम्ही सुरवातीच्या काळातील जिवाणूंमधील प्रकाश संश्लेषण संरचना आणि त्याची कार्यपद्धती, याविषयीची माहिती मिळवेली आहे. प्रत्यक्षातील माहितीच्या विश्लेषणातून सध्याच्या प्रकाश संश्लेषण उत्क्रांतीच्या सिद्धान्ताला हादरे बसत आहेत. 
  • त्यांनी हेलिओबॅक्टेरियम मॉडेस्टिकॅलडम या उष्ण झऱ्यांच्या आसपास, माती आणि पानथळ जमिनीमध्ये आढळणाऱ्या जिवाणूचा अभ्यास केला आहे. हे जिवाणू अनऑक्सिजेनिक (ऑक्सिजनविरहित) प्रकाश संश्लेषण करतात. हा प्रकार सध्याच्या ऑक्सिजेनिक प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सायनोबॅक्टेरिया या जिवाणूशी दूरवरून जोडलेला आहे. सायनोबॅक्टेरिया आणि या जिवाणूंचा प्राचीन पूर्वज अब्जावधी वर्षापूर्वी एक असावा. 
  • या दोन्ही जिवाणूंचा संरचनेचा तुलनात्मक अभ्यास व विश्लेषण करण्यात आले. त्यात डॉ. कार्डोना यांना विलक्षण साम्य आढळले. 
  • वनस्पती आणि सायनोबॅक्टेरिया प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचे विभाजन करतात. सायनोबॅक्टेरियाची उत्क्रांती ही ऑक्सिजेनिक प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पहिल्यांदा दिसून येत असल्याचे मानले जाते. मात्र, एच. मॉडेस्टिकॅलडममध्ये अशाच संरचना आढळल्याने प्रकाश संश्लेषणाची ही प्रक्रियाही पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये जुनी असल्याचे दिसून येते. अगदी ऑक्सिजनविरहित प्रक्रियेइतकी जुनी किंवा पहिली नसली तरी त्या प्रक्रियेनंतर त्वरित विकसित झाली असावी, असे डॉ. कार्डोना यांनी सुचविले आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com