agriculture stories in marathi agrowon देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीstraight cotton varieties research station at 100 years | Agrowon

देशी कपाशीतील संशोधनाची शंभरी

डॉ. अशोक ढवण
शनिवार, 7 डिसेंबर 2019

परभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची स्थापना देशी कापसाचे संशोधन व विस्तार करण्यासाठी सन १९१८ मध्ये निजाम राजवटीत करण्यात आली. या संशोधन केंद्राच्या स्थापनेला आज (ता. ७ डिसेंबर) १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने झालेल्या संशोधनाचा घेतलेला आढावा. 
 

परभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची स्थापना देशी कापसाचे संशोधन व विस्तार करण्यासाठी सन १९१८ मध्ये निजाम राजवटीत करण्यात आली. या संशोधन केंद्राच्या स्थापनेला आज (ता. ७ डिसेंबर) १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने झालेल्या संशोधनाचा घेतलेला आढावा. 
 

मेहबूब बाग येथील कापूस संशोधन केंद्राने मागील १०० वर्षांत केलेल्या संशोधनामुळे देशी कापसाच्या धाग्याची लांबी १७ ते १८ मिमी पासून ३२ मिमीपर्यंत वाढविण्यात यश आले आहे. त्याचबरोबर अधिक उत्पादन व अन्य गुणधर्मात सरस असणारे वाण विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सेवेत देण्यासाठी सक्षम झाले आहे. यामध्ये डॉ. एल. ए. देशपांडे यांचे संशोधन विशेष उल्लेखनीय आहे.

संशोधन केंद्राच्या उपलब्धी 

 •    विद्यापीठ स्थापनेपूर्वी या कापूस संशोधन केंद्रामार्फत देशी कापसाचे गावरानी १२, गावरानी २२ व गावरानी ४६ हे वाण विकसित करण्यात आले. परंतु, या वाणांची एकरी उत्पादकता कमी होती. 
 •    विद्यापीठ स्थापनेनंतर देशी कापसाची उत्पादकता, धाग्यांची लांबी व इतर गुणधर्म वाढविण्यावर संशोधन करण्यात आले. १९८० मध्ये देशी कापसाचा पीए ३२ (एकनाथ) हा वाण कोरडवाहू लागवडीसाठी प्रसारित केला. 
 •    या वाणाची हेक्टरी उत्पादकता १० ते ११  क्विंटल होती. सन २०१२ मध्ये पीए ०८ हा तंतूविरहीत सरकी असणारा, तेलाचे अधिक प्रमाण व तेलात गॉसिपॉल या हानिकारक रासायनिक घटकाचे प्रमाण कमी असणारा वाण विकसित केला. सन २०१३ मध्ये पीए ५२८ हा रुईचा अधिक उतारा तसेच २७ ते २८ मिमी धाग्याची लांबी असणारा वाण विकसित करण्यात आला. हे सर्व देशी कापसाचे वाण कोरडवाहू लागवडीस योग्य आहेत तसेच रसशोषक किडींना प्रतिकारक आहेत. 
 •    या केंद्रामार्फत २०१८ मध्ये पीए ७४० हा वाण मराठवाड्यासह  आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांसाठी प्रसारित करण्यात आला आहे. त्याच्या धाग्यांची लांबी २८ ते २९ मिमी आहे. 
 •    सन २०१९ मध्ये अखिल भारतीय सामन्वयित कापूस सुधार प्रकल्पाद्वारे पीए ८१२ हा वाण प्रसारित करण्यात आला. सर्वात जास्त धाग्याची लांबी व मजबुती असलेला हा देशी कापसाचा वाण आहे. 

जागतिक संशोधन 

 •  पूर्वी देशी -कापसाची उत्पादकता कमी होती. देशी कपाशीतील पैदास आणि संशोधनातून उत्पादकतेमध्ये वाढ झाली.
 •  बोंडाचा आकार पूर्वी लहान होता. संशोधनातून अमेरिकन कपाशी सारखे गुणधर्म देशी वाणांमध्ये परिवर्तित केल्यामुळे देशी कपाशीच्या बोंडाचा आकार वाढला.
 •  पारंपरिक देशी कपाशीचा धागा निकृष्ट होता. कापूस संशोधन केंद्राने अमेरिकन प्रजातीमधील धाग्याचे सरस गुणधर्म या देशी प्रजातीमध्ये आणले. 

भारतातील सर्वप्रथम वाण

 •     पीए २५५ ः धाग्याचे सरस गुणधर्म असणारा भारतातील सर्वप्रथम वाण (१९९९)
 •     पीए ४०२ ः देशी व अमेरिकन या प्रजातींच्या आंतरजातीय संकराद्वारे विकसित जगातील सर्वप्रथम वाण (२००८)
 •     पीए ०८ ः तंतुविरहित सरकी असणारा एकमेव वाण (२०१२)
 •     पीए ५२८ ः लांब धागा व रुईचा सर्वाधिक उतारा (३९ टक्के) असलेला देशी वाण (२०१३) 
 •     पीए ८१२ ः जगातील प्रसारित देशी वाणांमध्ये धाग्याची लांबी सर्वाधिक असणारा वाण (२०१९) 

(लेखक परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू आहेत.)


इतर बातम्या
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
वंचितच्या ‘बंद’चा बाजारपेठांवर परिणामअकोला  ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कारअकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
पशुगणना प्रगणकांचे मानधन थकलेसांगली : पशुविभागाकडून जिल्ह्यातील एप्रिल-मे...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
आवर्तनात पाणीबचत केल्यास सत्कार करणार ः...नगर ः यंदा सर्व धरणे लवकर भरली. परतीचा पाऊसही...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणी क्षेत्रात...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी...
अमरावती जिल्ह्यात ओलाव्यानंतरही रब्बीची...अमरावती  ः मॉन्सूनोत्तर पाऊस आणि अवकाळी...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...