agriculture stories in marathi agrowon agralekh on free trade to pakistan | Page 2 ||| Agrowon

खुला व्यापार; फायदे अपार

विजय सुकळकर
गुरुवार, 31 मे 2018

अस्थिर परिस्थिती; तसेच संभ्रमाच्या वातावरणात व्यापारी निर्यातीचे नियोजन करू शकत नाहीत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानला शेतीमालाची निर्यात वर्षभर खुली असायला हवी.

अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू असून, या दोन्ही 
 देशांना शेतीमाल निर्यात वाढविण्याची आपल्याला चांगली संधी आहे; पण या संधीचा अद्याप तरी आपण योग्य तो लाभ उचललेला नाही. कारण जागतिक बाजारातही मंदीचे वातावरण आहे. शेतीमालाचे दर तर खूपच खालावलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच निर्यात खोळंबली आहे. व्यापारस्पर्धेतून यापूर्वी अनेक व्यापारयुद्धे जुंपली असून, त्याचे परिणाम संबंधित दोन्ही देशांना भोगावे लागले आहेत. भारत पाकिस्तान या दोन शेजारील देशांत शेतीमालाची मोठी आयात-निर्यात होते; परंतु दोन्ही देशांत नेहमीच तणावपूर्ण स्थिती असते. त्याचा फटका दोन्ही देशांतील उत्पादक शेतकरी आणि उपभोक्ता ग्राहकांना बसत आला आहे. आपल्या देशातून पाकिस्तानमध्ये टोमॅटो, आले, मिरची, आंबा, लिंबू आदी भाजीपाला-फळांसह इतरही शेतीमालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. साखरेसह काही उत्पादने आपण पाकिस्तानातून आयातही करतो. शेतीमालाच्या आयात-निर्यातीसाठी हे दोन्ही देश एकमेकांना जवळचे आणि सोईचे आहेत. या देशात शेतीमाल पाठविणे अथवा आयात करणे याकरिता वेळ आणि खर्च अत्यंत कमी लागतो. अशावेळी दोन्ही देशांतील व्यापारवृद्धीत दोघांचाही फायदा आहे; परंतु तसे न होता काही ना काही कारणाने सातत्याने दोन्ही देशांत तणाव वाढतो. तणाव वाढला की व्यापारास खीळ बसून दोन्ही देशांचे नुकसानच होते.

अलीकडे पाकिस्तानमधून साखर आयात करण्यात आल्यानंतर आपले टोमॅटो या देशात निर्यात झाले पाहिजेत, अशी मागणी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. टोमॅटो हे फळभाजीपाला पीक आपल्या देशात बहुतांश राज्यांत हंगामनिहाय घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये हे पीक मात्र शेतकरी वर्षभर (तिन्ही हंगामांत) घेतात. भावाच्या चढ-उतारास हे पीक खूपच संवेदनशील आहे. नोटाबंदीनंतर शेतीमाल बाजारात पसरलेले मंदीचे सावट अजूनही कमी झालेले नाही. मागील वर्षभरापासून टोमॅटो उत्पादकांचा उत्पादन खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. याचा उत्पादन खर्च १० रुपये प्रतिकिलोच्या वर जात असताना शेतकऱ्यांना दर मात्र दोन ते तीन रुपये मिळतोय. टोमॅटोची निर्यात शेजारील पाकिस्तान, बांगलादेशला चालू राहिली, म्हणजे मालास उठाव राहून दरही वधारतात. गुजरातमधील व्यापारी दररोज ५०० टनांच्यावर भाजीपाला (दिल्ली-वाघामार्गे) पाकिस्तानला निर्यात करतात. यात मोठा वाटा हा टोमॅटोचा असतो. आपल्या राज्यातूनही हंगामात टोमॅटोची पाकिस्तानला निर्यात होते; परंतु तणावपूर्ण स्थिती आणि सीमाबंदी यात मुख्य अडसर ठरत आला आहे. ऑगस्टनंतर चार-पाच महिन्यांसाठी निर्यात खुली होईल, असा अंदाज बांधला जात असला, तरी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. निर्यातीचे नियोजन व्यापाऱ्यांना दोन-तीन महिन्यांपासून आधीच करावे लागते. अस्थिर परिस्थिती; तसेच संभ्रमाच्या वातावरणात व्यापारी निर्यातीचे नियोजन करू शकत नाहीत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानला शेतीमालाची निर्यात वर्षभर खुली असायला हवी. केंद्र सरकार पातळीवर कृषी, वाणिज्य, परराष्ट्र धोरण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक पावले उचलायला हवीत. खेळ आणि व्यापार याद्वारे दोन देशांतील तणाव कमी होतो, मैत्रीपूर्ण सौहार्दतेचे वातावरण निर्माण होते. अशावेळी दोन्ही देशांनी व्यापारवृद्धीसाठी पुढाकार घ्यायला हवा. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...