agriculture stories in marathi agrowon agralekh on proposed hike in electricity rate | Page 2 ||| Agrowon

विजेचा धक्का नकोच

विजय सुकळकर
बुधवार, 25 जुलै 2018

शेतकऱ्यांचा विजेचा खरा वापर दाखवून वीजचोरी, 
गळती कमी केली, तर वीजदरवाढीची गरजच महावितरणला पडणार नाही.

महावितरण कंपनीने ३० हजार कोटींची महसुली तूट भरून काढण्यासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे पाठविला आहे. येत्या दोन वर्षांत राज्यातील वीज ग्राहकांवर सरासरी २२ टक्के दरवाढ लादून कंपनीला ही तूट भरून काढायची आहे. हा प्रकार म्हणजे विजेची गळती, भ्रष्टाचाराला संरक्षण असून, ग्राहक व शासनाचीही लूट करणारा आहे, असे सरकारसमोर अनेक संघटनांनी मांडले आहे. दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी दिला आहे. या दरवाढीचा फटका सर्वच वीज ग्राहकांना बसणार असला तरी त्यात सर्वाधिक भरडला जाणार आहे तो शेतकरी. मागील दोन-अडीच वर्षांत शेतीसाठीच्या विजेचे दर दुप्पट करण्यात आले आहेत. उद्योजकांच्याही अनेक सवलती काढून घेण्यात आल्या आहेत. राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत मुळातच अधिक असताना प्रस्तावित दरवाढ ही घातक असून शेती, उद्योग व्यवसाय विकासाला खीळ घालणारी ठरेल. विद्युत अपिलीय प्राधिकरण नवी दिल्लीने १० टक्क्यांवर दरवाढ करणे म्हणजे ग्राहकांना थेट धक्का (डायरेक्ट शॉक) असून, असा धक्का देता येणार नाही, असे अनेक निकाल यापूर्वी दिले आहेत. असे असताना २२ टक्के दरवाढ ग्राहकांना मोठा धक्का देणारी ठरेल, यात शंकाच 
नाही. 

वाढत्या महागाईच्या हिशोबाने वीजदरवाढ व्हायला पाहिजे, असा दावा महावितरण करते. महावितरणचा ७५ ते ८० टक्के खर्च हा विजेच्या खरेदीवर होतो. या खर्चात गेल्या तीन वर्षांत वाढ झालेली नाही. उर्वरित २० ते २५ टक्के खर्च रकमेवर सहा टक्के महागाई वाढ मान्य केली तरी ते एकूण खर्चाच्या दोन ते तीन टक्के होते. आणि एवढी वाढ तर आयोगाने दिलेली आहे. त्यामुळे महावितरणचा हा दावाही दिशाभूल करणारा ठरतो. थकीत वसुली आणि तुटीच्या भरपाईचा आकडा (३० हजार कोटी) एकच आला आहे. हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा. गंभीर बाब म्हणजे यात २४ हजार ६०० कोटी अशी सर्वाधिक थकीत वसुली शेतकऱ्यांवर दाखविली आहे. शेतकऱ्यांचा वीजवापर ३० टक्के, तर गळती केवळ १५ टक्के दाखविण्यात येते. यातून शेतकरी अधिक वीज वापरतो आणि तो कधी वीजबील भरतदेखील नाही, अशी त्याची बदनामी होते. वस्तुस्थिती मात्र अगदी उलट आहे. शेतकऱ्यांचा वीजवापर १५ टक्के असून गळती ३० टक्के आहे. १५ टक्के गळती शेतकऱ्यांच्या नावे खपविली जाते. तसेच बहुतांश शेतकऱ्यांना होणारे  विजेचे बिलिंगही दुप्पट केले जाते, हे माहिती अधिकार कायद्याखाली मागविलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचा विजेचा खरा वापर दाखवून विजेची चोरी, गळती कमी केली तर वीजदरवाढीची गरजच महावितरणला पडणार नाही. असे झाले तर शेतकऱ्यांना होणारे बिल आणि शासनालाही विजेसाठी द्यावे लागणारे अनुदान दोन्ही निम्म्यावर येईल. वीजगळती असो की शेतकऱ्यांना होणारे अधिकचे बिलिंग याबाबत राज्य शासन चांगले अवगत आहे. महावितरण कंपनीदेखील शासनाचीच आहे. अशावेळी शासनाने राज्यातील वीज ग्राहकांच्या हितार्थ निर्णय घ्यायला हवा. एवढेच!


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...