यीस्टद्वारे कर्करोगरोधक औषधांच्या कृत्रिम निर्मितीसाठी प्रयत्न

यीस्टद्वारे कर्करोगरोधक औषधांच्या कृत्रिम निर्मितीसाठी प्रयत्न
यीस्टद्वारे कर्करोगरोधक औषधांच्या कृत्रिम निर्मितीसाठी प्रयत्न

अनेक वनस्पतींमध्ये कर्करोग निवारक मूलद्रव्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात. त्यांची निर्मिती सध्या कृत्रिमरीत्या करता येत नाही. मात्र, अत्यल्प प्रमाणात असलेल्या मूलद्रव्यासाठी संपूर्ण पिकाची लागवड करावी लागते. यातून जैवविविधतेसह विविध मर्यादा येतात. त्यावर मात करण्यासाठी जैवसंघटन पद्धतीने यीस्ट पेशीमध्ये ही मूलद्रव्ये मिळण्यासाठी नोवो नॉर्डिक फाउंडेशन सेंटर फॉर बायसस्टेनेबिलिटी यांच्या नेतृत्वाखाली खास संशोधन प्रकल्प आखण्यात आला आहे. सध्या औषधांच्या निर्मिती व रसायन उद्योगाला दुर्मीळ अशा वनस्पतींच्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. या वनस्पतींच्या लागवड, काढणी आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये अनेक लोक कार्यरत आहेत. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारी काही मूलद्रव्ये ही अत्यंत अल्प प्रमाणात मिळतात. मात्र त्यासाठी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठे क्षेत्र अडकून पडते. तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये टाकावू घटकांचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतात. सध्या औषधांची निर्मिती करणारी फ्रेंच कंपनी शेकडो टन औषधी वनस्पतीच्या बिया व संबंधित घटक आयात करते. मात्र नव्या कायद्यानुसार त्यावर मर्यादा आल्या आहेत. अशा कारणांमुळे कृत्रिमरीत्या औषधी घटकांच्या निर्मितीसाठी विविध पद्धतीचा अवलंब वाढत आहे. नोवो नॉर्डिक फाउंडेशन सेंटर फॉर बायसस्टेनेबिलिटी येथील संशोधक कर्करोग आणि मानसिक आजारांच्या उपचारातील काही औषधांच्या निर्मितीसाठी पर्यायी पद्धतींचा शोध घेत आहे. मियामी या प्रकल्पाला युरोपिय महासंघाच्या वतीने ६ दशलक्ष युरो इतके अनुदान दिले आहे. भारतीय सर्पगंधा (शा. नाव - Rauvolfia serpentina) या वनस्पतीतील काही मूलद्रव्ये ही कर्करोगाला प्रतिरोध करणारी आहेत. वनस्पतीच्या बाहेर ही मूलद्रव्ये विकसित करणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. अशी मूलद्रव्ये जैवसंघटन प्रक्रियेतून प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे. पेशीमध्ये नेमक्या कोणत्या विकरामुळे (एन्झाईम) मूलद्रव्य तयार होते, याचा शोध मियामी प्रकल्पामध्ये घेण्यात येत आहे. भविष्यामध्ये यीस्टच्या पेशीमध्ये अशा विकरांचे जनुक टाकून मोठ्या प्रमाणात मूलद्रव्य तयार करणे शक्य होईल, अशा विश्वास संशोधकांना आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com