agriculture stories in marathi agrowon Aromatic Jiranium plantation & processing | Page 2 ||| Agrowon

सुगंधी जिरॅनियम शेतीसह प्रक्रियेलाही सुरुवात

विकास जाधव
बुधवार, 1 जुलै 2020

ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख पारंपरिक पिकांबरोबर आता जिरॅनियम या सुगंधी वनस्पतीची नव्याने लागवड वाढत आहे. सध्या जिल्ह्यात करार पद्धतीने ५० शेतकऱ्यांनी ५० एकर क्षेत्रावर जिरॅनियमची लागवड केली आहे.

ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख पारंपरिक पिकांबरोबर आता जिरॅनियम या सुगंधी वनस्पतीची नव्याने लागवड वाढत आहे. सध्या जिल्ह्यात करार पद्धतीने ५० शेतकऱ्यांनी ५० एकर क्षेत्रावर जिरॅनियमची लागवड केली आहे. केवळ लागवडीवर न थांबता या शेतकऱ्यांनी स्वमालकीच्या प्रक्रिया केंद्राची उभारणी केली आहे. यामुळे रोप निर्मितीपासून तेल निर्मितीपर्यंत सर्व यंत्रणा एकाच छताखाली आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील सुधाकर साबळे हे कृषी पदवीधर असून, त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कारही मिळाला आहे. फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, रेशीम शेती, देशी गोपालन, ऊस, हळदीचे विक्रमी उत्पादन अशा टप्प्यानंतर त्यांनी जिरॅनियम या सुगंधी वनस्पतीच्या शेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. सातत्याने नावीन्याचा शोध घेणाऱ्या साबळे यांना जिरॅनियम शेतीची माहिती मिळाली. इंटरनेटवर त्याची सखोल माहिती घेतली. नगर जिल्ह्यातील अंभोळे येथील मच्छिंद्र चौधरी यांची जिरॅनियम शेती व तेलनिर्मिती यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिरॅनियम तेल काढणारी व सध्या बंद असलेल्या सुमारे २५ युनिटचीही पाहणी केली. त्यांची बंद पडण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रमुख कारण होते मार्केटिंग असल्याचे दिसून आले. प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी जिरॅनियम तेलापासून सुगंधी अत्तर तयार करणाऱ्या कंपनीशी त्यांची नेमकी मागणी आणि स्वीकारार्ह मालाविषयीचे निकष यांची माहिती घेतली. कंपनीसोबत माल खरेदीसाठी करार करण्यात आला. त्यानंतर जिरॅनियम शेतीचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

जिरॅनियमची लागवड
सुरुवातीच्या काळात साबळे यांनी रोपे आणून स्वतःच्या क्षेत्रात लागवड केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी शेतकऱ्यांना या पिकांचे उत्पादन व त्याचे फायदे याविषयी प्रबोधन केले. देशात जिरॅनियमपासून सुगंधी तेलाचे मागणीच्या तुलनेत केवळ पाच टक्के उत्पादन होते. उर्वरित ९५ टक्के तेल आयात केले जाते. यात संधी असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतःच्या लागवडीसोबत अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले. रोग किडीचा प्रादुर्भाव कमी असून, उसापेक्षा अधिक उत्पन्न यातून मिळू शकेल, हे अन्य शेतकऱ्यांना पटवून दिले. सध्या जिल्ह्यात ५० शेतकऱ्यांनी सुमारे ५० एकर क्षेत्रावर जिरॅनियमची लागवड केली आहे.
सध्याचे क्षेत्र पाहता जिरॅनियमपासून तेलनिर्मितीच्या चार युनिटची गरज आहे. सध्या त्यातील पहिले युनिट बसवण्यात आले आहे. या युनिटमधून ७० टन जिरॅनियमचे गाळप केले असून, त्यातून ४५ किलो तेल मिळाले आहे. या तेलाची विक्री दहा हजार रुपये प्रतिकिलो या प्रमाणे करार केलेल्या कंपनीला विक्री करण्यात आली. लॅाकडाऊननंतर वातावरण सुरळीत झाल्यानंतर उर्वरित तीन युनिट बसवण्यात येणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मदत
जिल्ह्यात जिरॅनियम वनस्पतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून प्रयत्न केले जात आहे. बँकेकडून जिरॅनियम पिकांसाठी पीक कर्ज उपलब्ध केले आहे. प्रक्रियेला चालना देण्यासाठी अर्थपुरवठा केला जात आहे. यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, व्यवस्थापक सुजित शेख यांची मदत झाल्याचे साबळे यांनी सांगितले.

जिरॅनियम शेती

  • सर्व प्रकारच्या शेतजमिनीच वर्षभर लागवड करता येते.
  • एकरी आठ हजार रोपाची लागवड करतात.
  • एकदा लागवड केल्यानंतर तीन ते पाच वर्षे लागवड करावी लागत नाही.
  • जिरॅनियमचे दर तीन महिन्याला कापणी केली जाते.
  • दर तीन महिन्याला एकरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते.
  • सहा हजार रुपये प्रतिटन या प्रमाणे ७२ ते ९० हजार रुपये मिळतात.
  • उत्पादन खर्च साधारणपणे ३० हजार रुपये होतो.

 

आपल्याकडे जिरॅनियम लागवड फारशी केली जात नाही. उत्पादन व मागणी यामध्ये खूप मोठे अंतर आहे. कंपनीशी थेट करार केल्यामुळे अन्य पिकाच्या तुलनेमध्ये स्थिर उत्पन्न हाती येते. आम्ही प्रक्रिया युनिटही उभे करत आहोत. त्यामुळे जिरॅनियम शेती शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरण्यास मदत होणार आहे.
-सुधाकर साबळे, ७३५०८५७००९
शेतीनिष्ठ शेतकरी, वडूथ, जि. सातारा.


इतर यशोगाथा
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...
सव्वाशेहून देशी बियाणे संवर्धन,...उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील धनाजी...