agriculture stories in marathi agrowon aware of fall american army worm in cotton | Agrowon

कपाशीवरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

बाबासाहेब फंड, चिन्ना बाबू नाईक, विश्लेष नगरारे, नंदिनी गोकटे-नरखेडकर, विजय वाघमारे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

सुसरे (जि. नगर) तसेच परभणी जिल्ह्यातही कापूस पिकात अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या किडीचा प्रादुर्भाव आढळला आहे. घाबरून न जाता वेळीच उपाय केल्यास शेतकऱ्यांना या अळीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य आहे.

कपाशीवर अमेरिकन लष्करी या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास करावयाच्या उपाययोजना

सुसरे (जि. नगर) तसेच परभणी जिल्ह्यातही कापूस पिकात अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या किडीचा प्रादुर्भाव आढळला आहे. घाबरून न जाता वेळीच उपाय केल्यास शेतकऱ्यांना या अळीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य आहे.

कपाशीवर अमेरिकन लष्करी या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास करावयाच्या उपाययोजना

१) प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करणे
मका पिकाच्या अवशेषांमधील अळ्यांचे कपाशी व अन्य पिकांवर होणारे संक्रमण रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी मका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या साह्याने अवशेषांचे बारीक तुकडे वा भुगा करावा.
त्यावरील अळ्या व मातीतील कोष त्यामुळे चिरडले जाऊन किडीचे नियंत्रण
मिऴण्यास मदत होईल.
२) रोटावेटर वापरण्यापूर्वी शेतातील पीक अवशेषांवर मेटारायझीयम अनिसोप्ली हे मित्रबुरशीवर आधारीत कीटकनाशक पाच ग्रॅम अथवा नोमुरिया रिलायी (मित्रबुरशीवर आधारित कीटकनाशक) पाच ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे रोटावेटरच्या वापराकून ते मातीत व्यवस्थित मिसळले जाऊन जैविक बुरशींद्वारे चांगले नियंत्रण मिळू
शकेल.
३) सध्या पावसाळी वातावरणामुळे हवेतील आर्द्रतेचे अधिक प्रमाण हे जैविक बुरशीच्या वाढीसाठी पोषक आहे.
४) मका पिकाचे अवशेष शेतात तसेच उभे किंवा बांधावर साठवून ठेऊ नयेत.
५) यांत्रिक पद्धती- कपाशीचे प्रादुर्भाग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ्यांसहित नष्ट करावेत. जेणेकरून
अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल.
६) रासायनिक पद्धती
पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.८ मिली अथवा क्लोरॲंट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ प्रति लिटर पाणी याप्रमाणे त्वरीत एक फवारणी घ्यावी.
७) जैविक नियंत्रण- त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीयम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा
नोमुरिया रिलाई ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्यास किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
८) कामगंध सापळ्यांचा वापर
सध्या वाढीच्या अवस्थेतील अळ्या लवकरच कोषावस्थेत जाऊन त्यातून बाहेर निघणारे पतंग पुन्हा अंडी घालण्यास सुरवात होईल. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पतंगांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे कामगंध सापळे उभारावेत. सापळ्यांमध्ये पतंग अडकण्यास सुरवात झाल्याच्या दोन ते तीन दिवसांनंतर शेतामध्ये पानांच्या खालील बाजूने लष्करी अळीचे अंडीपूंज दिसण्यास सुरवात होते. त्या अनुषंगाने वेळेत नियंत्रणाचे उपाय अवलंबवावेत.
९)अंडीपूंज व अळ्या गोळ्या करून नष्ट करणे- पानांच्या खालील बाजूने असणारे लष्करी अळीचे
अंडीपूंज व अंड्यांतून नुकत्याच बाहेर पडलेल्या सुरवातीच्या अवस्थेतील समूहाने राहणाऱ्या
अळ्या शोधून त्वरीत नष्ट कराव्यात. सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या या केवळ पानेच खात
असल्याने त्यांचा वेळेत नायनाट केल्यास पुढे फुले व बोंडाना होणारे नुकसान टाळता येणे शक्य
आहे.

संपर्क- डॉ. बाबासाहेब फंड-७५८८७५६८९५
कीटकशास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर


इतर ताज्या घडामोडी
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...
‘किसान सन्मान’ निधी : दोष प्रशासनाचा,...जळगाव : शासकीय यंत्रणेकडून बॅंक खात्यासंबंधीची...